सलमानचं नाव ऐकून चित्रपट नाकारायचा 'हा' अभिनेता; २३ वर्ष एकत्र केलं नाही काम, असं काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 14:56 IST2026-02-25T14:51:13+5:302026-02-25T14:56:44+5:30

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याने सलमान खानसोबत काम करण्यास दिलेला नकार, काय होतं कारण?

bollywood actor danny denzongpa refused to do work with salman khan know the reason behind it | सलमानचं नाव ऐकून चित्रपट नाकारायचा 'हा' अभिनेता; २३ वर्ष एकत्र केलं नाही काम, असं काय घडलेलं?

सलमानचं नाव ऐकून चित्रपट नाकारायचा 'हा' अभिनेता; २३ वर्ष एकत्र केलं नाही काम, असं काय घडलेलं?

Danny Denzongpa : हिंदी सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व असलेला अभिनेता, खलनायक म्हणून डॅनी डेन्ग्झोपा यांना ओळखलं जातं. सृदृढ देहयष्टी, स्टायलिश अंदाज, बारीक पण तीक्ष्ण डोळे, अॅग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज, गरजणारा आवाज आणि पावरफुल स्क्रिन प्रेझेंसमुळे त्यांच्या भूमिका नेहमीच लार्जर दॅन लाइफ वाटल्या.या जोरावर अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारलाही रुपेरी पडद्यावर तगडी टक्कर दिली. आजही लोक त्यांचे सिनेमे मोठ्या आवडीने पाहतात.मात्र ,तुम्हाला माहितीये का डॅनी यांनी सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला होता. जवळपास २३ वर्ष त्यांनी एकत्र काम केलं नाही. काय होतं कारण जाणून घेऊया... 

केवळ हिंदी सिनेमातला खलनायक इतकीच डॅनी यांची ओळख मर्यादित राहात नाही. डॅनी यांनी बी आर इशरांच्या ‘जरूरत’ या बी ग्रेड सिनेमातून सुरुवात केली.
‘चोर मचाए शोर’, ‘खोटे सिक्के’, ‘काला सोना’ अशा सिनेमात त्यांनी यादगार भूमिका  साकारल्या. खलनायकाच्या भूमिकेत ‘अंदर बाहर’, ‘आंधी तूफान’, ‘भगवान दादा’, ‘अग्निपथ’, ‘हम’, ‘घातक’, ‘क्रांतीवीर’ अशा अनेक सिनेमांमध्ये डॅनींनी अमिताभ, धमेंद्र ते सनी देओलपर्यंतच्या नायकांना शह दिला. परंतु, डॅनी यांनी सलमान खानचं नाव ऐकताच अनेक चित्रपट नाकारल्याचं सांगितलं जातं. 

सलमान सोबत काम केलं नाही काम...

सलमान खान आणि डॅनी यांनी पहिल्यांदा सनम बेवफा या चित्रपटात एकत्र काम केले होते. मीडिया रिपोर्टनुसार, डॅनी नेहमीच वेळेवर असायचा, तर सलमान नेहमीच सेटवर उशिरा यायचा.दरम्यान, सलमानच्या या कृतीमुळे डॅनी त्याच्यावर खूप संतापले होते. त्यामुळे भर सेटवर ते सलमानवर ओरडले होते. याचा परिणाम असा झाला की हे दोघे २३ वर्ष एकमेकांशी बोलले नाहीत आणि एकत्र कामही केलं नाही. सलमानसोबतच्या कोणत्याही चित्रपटाच्या ऑफरला डॅनी नेहमीच नकार द्यायचे. पण, दोघांमधील मतभेद हा वैयक्तिक नसून व्यावसायिक पातळीवर होता.

वर्कफ्रंट

डॅनी डेन्ग्झोपा यांच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर २०२२ मध्ये आलेल्या 'ऊंची' चित्रपटात ते शेवटचे  दिसले होते. त्यानंतर ते कोणत्याही चित्रपटामध्ये दिसले नाही. डॅनी यांनी स्वतःला चित्रपट जगतापासून दूर केलं. 

Web Title : सलमान खान के साथ डैनी डेन्जोंगपा ने 23 साल तक काम नहीं किया: जानिए क्यों।

Web Summary : सलमान खान की देरी के कारण 'सनम बेवफा' के सेट पर विवाद के बाद डैनी डेन्जोंगपा ने 23 साल तक सलमान खान के साथ काम करने से परहेज किया। इस वजह से डेन्जोंगपा ने खान के साथ बाद की फिल्म के प्रस्तावों को अस्वीकार कर दिया। उन्हें आखिरी बार 'ऊंचाई' (2022) में देखा गया था।

Web Title : Danny Denzongpa avoided Salman Khan films for 23 years: Here's why.

Web Summary : Danny Denzongpa avoided working with Salman Khan for 23 years after a dispute on the set of 'Sanam Bewafa' due to Salman's tardiness. This professional disagreement led to Denzongpa rejecting subsequent film offers with Khan. He was last seen in 'Uunchai' (2022).