'अ‍ॅनिमल' नंतर बॉबी देओल पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवणार; नव्या सिनेमाची केली घोषणा, कधी होणार रिलीज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:45 IST2026-02-20T17:41:48+5:302026-02-20T17:45:22+5:30

बॉबी देओलचा कधीही न पाहिलेला अंदाज! 'अ‍ॅनिमल' नंतर अभिनेता बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज, अनुराग कश्यपसोबत केली हातमिळवणी 

bollywood actor bobby deol new movie bandar directed by anurag kashyap film release on this date | 'अ‍ॅनिमल' नंतर बॉबी देओल पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवणार; नव्या सिनेमाची केली घोषणा, कधी होणार रिलीज?

'अ‍ॅनिमल' नंतर बॉबी देओल पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवणार; नव्या सिनेमाची केली घोषणा, कधी होणार रिलीज?

Booby Deol Cinema: बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा त्याच्या सिनेमांसाठी ओळखला जातो. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता अॅनिमलच्या यशानंतर अभिनेत्याची आणखी एका हिंदी चित्रपटात वर्णी लागली आहे. नुकताच बॉबी देओलच्या आगामी सिनेमाचं नवीन पोस्टर समोर आलं आहे. बंदर असं या सिनेमाचं नाव असणार आहे. ज्यामुळे त्याच्या चाहते प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!


अनुराग कश्यप या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.स्वत बॉबी देओलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'बंदर' सिनेमाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांनी माहिती दिली आहे. या पोस्टवरील अभिनेत्याचा लूक  पाहिल्यानंतर चाहते आणखी उत्साहित झाले आहेत. सोशल मिडियासह सगळीकडेच अभिनेत्याच्या लूकची चर्चा होत आहे.

दरम्यान, या चित्रपटात बॉबी देओलसह सान्या मल्होत्रा ​​आणि सबा आझाद यांसारख्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा २२ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र,त्यापूर्वी बंदर सिनेमाचा प्रीमियर प्रतिष्ठित ५० व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (TIFF) दाखवला जाणार असल्याचीही माहिती मिळते आहे. या चित्रपटाची कहाणी एका सत्य घटनेवर आधारित आहे.

Web Title : 'एनिमल' के बाद बॉबी देओल फिर बॉक्स ऑफिस पर धमाल मचाएंगे, 'बंदर' में दिखेंगे।

Web Summary : 'एनिमल' की सफलता के बाद, बॉबी देओल अनुराग कश्यप द्वारा निर्देशित 'बंदर' में अभिनय करेंगे। सान्या मल्होत्रा और सबा आज़ाद के साथ, फिल्म 22 मई, 2026 को टोरंटो अंतर्राष्ट्रीय फिल्म महोत्सव में प्रीमियर के बाद रिलीज़ होगी। सच्ची घटनाओं पर आधारित।

Web Title : Bobby Deol to rule box office again after 'Animal' with 'Bandar'.

Web Summary : After Animal's success, Bobby Deol stars in 'Bandar,' directed by Anurag Kashyap. Co-starring Sanya Malhotra and Saba Azad, the film releases May 22, 2026, after premiering at the Toronto International Film Festival. Based on true events.