बिअर पाजली अन् सत्य वदवून घेतलं! बॉलिवूड अभिनेत्याची हटके प्रेमकहाणी, एका शोमुळे जुळल्या साताजन्माच्या गाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:10 IST2025-10-31T13:00:07+5:302025-10-31T13:10:04+5:30
८ वर्ष डेटिंग अन् नंतर बांधली लग्नगाठ, 'अशी' सुरु झालेली अभिनेत्याची प्रेमकहाणी, म्हणाली, "अर्धी बॉटल बिअर…"

बिअर पाजली अन् सत्य वदवून घेतलं! बॉलिवूड अभिनेत्याची हटके प्रेमकहाणी, एका शोमुळे जुळल्या साताजन्माच्या गाठी
Arshad Warsi Lovestory: एकीकडे बॉलिवूडमध्ये अॅक्शनपटांची चलती असताना पडद्यावर केवळ विनोदी भूमिका रंगवून आपल्या दमदार अभिनयाची मोहोर प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारा अभिनेता म्हणजे अर्शद वारसी. 'तेरे मेरे सपने' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या या नायकाने भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला. अर्शद वारसीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या अर्शदने मारिया गोरेट्टीसोबत आंतरधर्मीय विवाह केला. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याचा अनोख्या लव्हस्टोरीचा किस्सा शेअर केला आहे.
अर्शद वारसी आणि मारिया गोट्टी यांनी ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १९९९ मध्ये लग्न केलं.नुकत्याच राज शमानी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्शद वारसीने त्यांच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल सांगितलं.याचदरम्यान, त्यांच्या लव्हस्टोरीला कशी सुरुवात झाली याबद्दल बोलताना अर्शद म्हणाला, मारिया खूप साधी आणि चांगली मुलगी होती. रोज सकाळी ती चर्चेमध्ये जायची. मला ती आवडली कारण, ती खूप चांगलं नृत्य करायची आणि दिसायला देखील सुंदर होती.
मग अभिनेता म्हणाला की,"दरम्यान, एका कॉलेमधील नृत्यस्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मला तिथे परीक्षक म्हणून बोलावलं होतं. तेव्हा मी कोरिओग्राफ होतो. तिथे मी पहिल्यांदा मारियाला पाहिलं. चेहऱ्यावर स्मित हास्य आणि देखणी मुलगी तसंच ती उत्तम नृत्यांगणा देखील होती. त्यावेळी मी तिला नाटकाची ऑफर दिली पण तिने ती नाकारली. त्यानंतर एकेदिवशी ती आमचं नाटक पाहण्यासाठी आली. त्यामधील माझं काम तिला खूप आवडलं. मग ती आमच्यासोबत जोडली गेली. तिथूनच सगळ्या गोष्टी सुरु झाल्या. मला सगळेजण म्हणायचे, तिचं तुझ्यावर प्रेम आहे. पण, मी तिच्या प्रेमात पडलो नव्हतो.तिचे हावभाव सगळं काही सांगायचे. "
मारियाने अशी दिलेली प्रेमाची कबुली
आपल्या प्रेमकहाणीला सुरुवात कशी झाली याचा हटके किस्सा शेअर करताना अर्शद म्हणाला, "एकदा दुबईमध्ये आमचा शो होता.त्यावेळी सुंदर कॅथलिक मुलीला बिअर पाजली. अर्धी बॉटल संपवल्यानंतर तिच्या मनातील भावना बाहेर आल्या. तिथून मग आमच्या नात्याला सुरुवात झाली. त्यानंतर आमच्या भेटीगाठी वाढल्या आणि मग आम्ही लग्न केलं. आता मी तिच्याकडे पाहिल्यानंतर मला वाटतं तिच माझ्यासारखी परफेक्ट आहे. अशा भावना अभिनेत्याने व्यक्त केल्या.
