‘धुरंधर २ ’च्या यशाने अर्जुन रामपाल भारावला! आठवले संघर्षाचे दिवस, म्हणाला-" या प्रवासात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:35 IST2026-03-31T11:27:32+5:302026-03-31T11:35:46+5:30

‘धुरंधर २ ’ने पोहोचवलं यशाच्या शिखरावर तरीही पाय जमिनीवर; अर्जुन रामपाल भावुक, म्हणाला- "मी खूप..."

bollywood actor arjun rampal share emotional post amid dhurandhar 2 success says | ‘धुरंधर २ ’च्या यशाने अर्जुन रामपाल भारावला! आठवले संघर्षाचे दिवस, म्हणाला-" या प्रवासात..."

‘धुरंधर २ ’च्या यशाने अर्जुन रामपाल भारावला! आठवले संघर्षाचे दिवस, म्हणाला-" या प्रवासात..."

Arjun Rampal: भारत देशासह संपूर्ण जगभरात सध्या धुरंधर २ या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा  बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्डब्रेक कमाई, टीकेमुळे आणि प्रपोगंडा चित्रपट असल्याच्या आरोपांमुळे सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या सिनेमाची कथा आणि कलाकारांचा अभिनयाचं देखील सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. या चित्रपटात ISI प्रमुख मेजर इक्बालची भूमिका साकारून अभिनेता अर्जुन रामपाल चांगलाच भाव खाऊन गेला आहे.अर्जुन रामपाल सध्या 'धुरंधर २'च्या यशाचा आनंद घेत आहे.अशातच अर्जुन रामपालने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


अर्जुन रामपालने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्याद्वारे त्याने आपल्या संपूर्ण प्रवासावर भाष्य केलं आहे.या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिलंय," लहानपणी काऊबॉयची भूमिका साकारण्यापासून ते माझा पहिला चित्रपट मोक्ष. त्यानंतर आता धुरंधर... या प्रवासात मला अनेक लोकांची साथ मिळाली त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. तसेच मी माझे चाहते, कुटुंब आणि मित्रमंडळींचेही मी मनःपूर्वक आभार मानतो."

त्यानंतर अर्जुन रामपालने रणवीर सिंगच कौतुक त्याला बब्बर शेर असं देखील म्हटलं आहे.मग पुढे अर्जुन रामपालने आदित्य धर, विक्रम, ओजस गौतम, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी आणि इतर अभिनेत्यांचीही नावे घेतली. त्या पोस्टमध्ये अर्जुन रामपालने आपल्या यशाचं रहस्य उघड केलं, त्याने म्हटलंय,"मी खूप आनंदी आहे. माझा विश्वास आहे की स्वप्ने एक ना एक दिवस नक्कीच साकार होतात. जर तुम्ही संयम, समर्पण आणि आवड या  तत्त्वांचं पालन केलं, तर तुमची स्वप्नं नक्कीच साकार होतील." अशी पोस्ट लिहून अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

वर्कफ्रंट

हिंदी चित्रपटसृष्टीत डॅशिंग पर्सनालिटीच्या अभिनेत्यांमध्ये अर्जुन रामपाल याचे नाव सध्या आघाडीवर आहे.'आंखें', 'डॉन', 'रॉक ऑन! 'ओम शांती ओम', 'हाऊसफुल', 'राजनीति', 'Ra.One', 'डॅडी' या चित्रपटात नायक, खलनायक अशा विविध भूमिकांमुळे तो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. अर्जुनने राजीव राय यांच्या 'प्यार इश्क और मोहब्बत' (२००१) या रोमॅटिक चित्रपटातून सुनील शेट्टी, आफताब शिवदासानी आणि कीर्ती रेड्डी यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. सध्या तो धुरंधर २ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. 

Web Title : 'धुरंधर 2' की सफलता से अर्जुन रामपाल अभिभूत, संघर्ष के दिन याद आए।

Web Summary : अर्जुन रामपाल 'धुरंधर 2' की सफलता का जश्न मना रहे हैं, शुरुआती भूमिकाओं से लेकर वर्तमान प्रशंसा तक की एक भावनात्मक यात्रा साझा कर रहे हैं। उन्होंने परिवार, दोस्तों और प्रशंसकों से मिले समर्थन को स्वीकार किया, सपनों को साकार करने के लिए दृढ़ता, समर्पण और जुनून पर जोर दिया। रामपाल ने साथी अभिनेताओं की भी सराहना की और अपनी विविध फिल्मोग्राफी पर प्रकाश डाला।

Web Title : Arjun Rampal overwhelmed by 'Dhurandar 2' success, recalls struggles.

Web Summary : Arjun Rampal celebrates 'Dhurandar 2' success, sharing an emotional journey from early roles to current acclaim. He acknowledges support from family, friends, and fans, emphasizing perseverance, dedication, and passion as keys to realizing dreams. Rampal also praises fellow actors and highlights his diverse filmography.