अर्जुन कपूरची बहीण अंशुलाने गुपचूप केला साखरपुडा, बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाईलने केलं प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 10:17 IST2025-07-04T10:14:50+5:302025-07-04T10:17:47+5:30

डेटिंग अॅपवर पहिली भेट अन्; ३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अर्जुन कपूरच्या बहिणीने दिली प्रेमाची कबुली, होणारा नवरा आहे तरी कोण?

bollywood actor arjun kapoor sister anshula secretly got engaged with boyfriend rohan thakkar photo viral | अर्जुन कपूरची बहीण अंशुलाने गुपचूप केला साखरपुडा, बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाईलने केलं प्रपोज

अर्जुन कपूरची बहीण अंशुलाने गुपचूप केला साखरपुडा, बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाईलने केलं प्रपोज

Anshula Kapoor : प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते बोनी कपूर (Bonnie Kapoor) आणि मोना शौरी यांना अर्जुन आणि अंशुला ही दोन मुलं आहेत. अर्जुन कपूर (Arjun Kapor) हे कलाविश्वातील लोकप्रिय असलेलं नाव आहे. मात्र, अंशुलाने वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. दरम्यान, अंशुला कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अर्जुन कपूरची बहीण अंशुलाने तिचा बॉयफ्रेंड रोहन ठक्करसोबत साखरपुडा करत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर आपल्या साखपुड्याचे फोटो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. 


अंशुला कपूरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर खास क्षण शेअर केले आहेत. रोहनसोबत तिची पहिली भेट कशी झाली अशी रोमॅन्टिक स्टोरी तिने या पोस्टद्वारे सांगितली आहे. रोहनने न्यू यॉर्कच्या आयकॉनिक सेंट्रल पार्कमध्ये अंशुलाला फिल्मी स्टाईलने गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. अंशुलाने चाहत्यांसोबत तिच्या साखरपुड्याची आनंदाची बातमी शेअर करताना लिहिलंय की, आमची पहिल्यांदा एका अॅपवर ओळख झाली. मला आठवतं एकेदिवशी मंगळवारचा तो दिवस होता. साधारण १:१५ वाजता आमच्यात बोलणं सुरू झालं. त्यानंतर मग आम्ही जवळपास सकाळी ६ वाजेपर्यंत बोलतच होतो. त्यानंतर मग आता ३ वर्षांनंतर त्याने माझ्या आवडत्या शहरातील सेंट्रल पार्कमधील कॅसलसमोर मला प्रपोज केलं.

त्यानंतर पुढे अंशुलाने लिहिलंय, त्याने मला भारतीय वेळेनुसार १.१५ वाजता प्रपोज केलं. त्या क्षणी असं वाटलं की सगळं जग थांबलंय... तो क्षण जादूई होता असं वाटत होतं. मी कधीही परीकथांवर विश्वास ठेवणारी मुलगी नव्हते.पण त्या दिवशी रोहनने मला जे गिफ्ट दिलं ते जगातील सर्वोत्तम गिफ्ट्सपैकी एक होतं. अगदी खरंय आणि मी हो म्हटलं. मी रडत होते, हसत होते आणि थरथर कापत होते. मला किती आनंद झाला ते मी शब्दात सांगू शकत नाही. २०२२ पासून तू माझ्यासोबत आहेस. मी माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबत नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. असं म्हणत अंशुलाने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, अंशुलाने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी मंडळींनी प्रेमाचा वर्षावर करत तिला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

रोहन ठक्करबद्दल जाणून घेऊया...

रोहन ठक्कर एक पटकथा लेखक आहे. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो सध्या करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये फ्रीलान्सर लेखक म्हणून काम करतो.
तिने कॅलिफोर्निया युनिव्हर्हसिटीमधून शिक्षण घेतलं आहे. सध्या तो मुंबईत वास्तव्यास आहे. 

Web Title: bollywood actor arjun kapoor sister anshula secretly got engaged with boyfriend rohan thakkar photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.