"मी खूप दारु प्यायचो...", १४ व्या वर्षापासून नशेच्या आहारी गेलेला अजय देवगण, 'अशी' सोडली सवय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 09:55 IST2025-10-28T09:43:23+5:302025-10-28T09:55:10+5:30
नशेच्या आहारी गेलेला अजय देवगण, वेलनेस स्पामध्ये जायची आलेली वेळ

"मी खूप दारु प्यायचो...", १४ व्या वर्षापासून नशेच्या आहारी गेलेला अजय देवगण, 'अशी' सोडली सवय
Ajay Devgan: चित्रपटसृष्टी, ग्लॅमर, पैसा आणि यश या सर्व गोष्टींबद्दल ऐकून अनेकांना मनोरंजनविश्वाचा हेवा वाटतो. मात्र, या झगमगाटाच्या दुयिनेचं वास्तव फार भीषण आहे. अनेकदा या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या वाट्याला यश आणि श्रीमंतीबरोब काही वाईट सवयीही नकळत येतात. बरेच कलाकार त्यांच्या कारकिर्दीच्या टप्प्यावर व्यसनाच्या आहारी गेले आहेत, याची जाहीरपणे कबुली देखील काहींनी दिली आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने देखील एका मुलाखतीत त्याच्या वाईट सवयींबाबत वक्तव्य केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. 'स्क्रीन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो व्यसनाधीन झाला होता, असं म्हटलं. या मुलाखतीत अभिनेता म्हणाला," मी प्रामाणिकपणे सांगतो, मी जे करतो ते लपवत नाही. मी पुर्वी खूप दारु प्यायचो. एका क्षणी मी त्या पॉइंटला पोहोचलो होतो, जिथे मी लोकांना सांगू शकतो की दारू त्यांच्यासाठी नाही जे अजिबात मद्यपान करत नाहीत. जे कमी प्रमाणात मद्यपान करतात त्यांच्यासाठी ते ठीक आहे. त्यामुळे मी वेलनेस स्पामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि दारू पिणं सोडलं."
त्यानंतर पुढे अभिनेत्याने म्हणाला, "त्यावेळी मी माल्ट अजिबात पीत नव्हतो.आता मी माल्टचे सेवन करायला सुरुवात केली आहे.माझ्यासाठी, ते मद्यपानासारखं नाही.पण, थकवा दूर करण्यासाठी, स्वत: ला शांत करण्यासाठी तु्म्ही त्याचं सेवन करु शकता. तुम्ही जेवणाबरोबर ३० ते ६० मिली त्याचं सेवन करु शकता. पण, मी खरंच ही मर्यादा पार केलेली नाही.
दरम्यान, एका पॉडकास्टमध्ये अजयने स्वत कबुली दिली होती की १४ वर्षांच्या वयात मित्रांच्या दबावामुळे त्याने दारु प्यायला सुरुवात केली होती. "माझी एक अडचण असते. मी कितीही प्यायलो तरी मला चढत नाही.ही अशी गोष्ट आहे जी काही काळानंतर सवय बनते. एकदा मी सुरुवात केली की, ते सोडणे कठीण होतं." असा खुलासा अजयने केला होता.