१५० कोटींचं बिग बजेट असलेला 'हा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर झाला फुस्स; आता ओटीटीवर मिळतेय पसंती, तुम्ही पाहिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:22 IST2025-10-03T17:16:09+5:302025-10-03T17:22:20+5:30
१५० कोटींचं बिग बजेट असलेला 'हा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर झाला फुस्स; आता ओटीटीवर मिळतेय पसंती, तुम्ही पाहिला?

१५० कोटींचं बिग बजेट असलेला 'हा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर झाला फुस्स; आता ओटीटीवर मिळतेय पसंती, तुम्ही पाहिला?
Bollywood Cinema: २०२५ मध्ये अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बरेच
चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, काही मोजक्याच चित्रपटांची चर्चा रंगली. यापैकी काही चित्रपट कमी बजेटमध्ये बनवण्यात आले होते, तर काही बिग बजेट होते.अशातच एका बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. १५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाचं नाव 'सन ऑफ सरदार-२' आहे. सध्या ओटीटीवर हा सिनेमा ट्रेंडिंगवर आहे.
'सन ऑफ सरदार-२' हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या सन ऑफ सरदार चित्रपटाचा सीक्वल आहे. या बिग बजेट चित्रपटात अजय देवगण आणि मृणाल ठाकूरची यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर रवी किशन,संजय मिश्रा, नीरु बाजवा, चंकी पांडे, कुब्रा सैत तसेच दीपक डोबरियाल, विंदू दारा सिंह, रोशनी वालिया या कलाकारांच्या देखील भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याची बरीच चर्चा होती, पण तो चित्रपटगृहात सन ऑफ सरदार-२ ला प्रेक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
'सन ऑफ सरदार-२' चित्रपटाचं दिग्दर्शन विजय अरोरा यांनी केलं आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यातंच हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाला सिनेरसिकांची चांगली पसंती मिळत आहे.शिवाय "सन ऑफ सरदार २" ने ओटीटीवर टॉप १० मध्ये स्थान मिळवलं आहे. तसेच देशभरात हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर तो आता घरबसल्या पाहू शकता.