आमिर खान नव्हे, 'लगान'मध्ये भुवनच्या भूमिकेत दिसला असता अभिषेक बच्चन; 'या' कारणामुळे दिलेला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:50 IST2026-02-05T13:47:49+5:302026-02-05T13:50:59+5:30
आमिर खान नाहीतर भुवनच्या भूमिकेसाठी अभिषेक बच्चन होता दिग्दर्शकाची पहिली पसंती, का नाकारली ऑफर?

आमिर खान नव्हे, 'लगान'मध्ये भुवनच्या भूमिकेत दिसला असता अभिषेक बच्चन; 'या' कारणामुळे दिलेला नकार
Abhishek Bachchan : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार सापडतील जे पडद्यावर भूमिका फक्त साकारत नाहीतर जगतात. अशा कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) .सध्याच्या घडीला त्याची गणना इंडस्ट्रीतील आघाडीच्या नायकांमध्ये केली जाते. अभिषेकने साल २००० मध्ये जे.पी.दत्ता यांचा रिफ्युजी या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेता तेरा जादू चल गया, ढाई अक्षर प्रेम के, बस इतना सा ख्वाब है, हा मैने भी प्यार किया है, ओम जय जगदीश, शरारत या सिनेमांमध्ये झळकला. अभिषेकने त्याला ऑफर केले गेलेले सगळेच चित्रपट सरसकट केले होते. परंतु, एका गाजलेल्या सिनेमाला नकार देणं, अभिषेकला करिअरच्या दृष्टिने नुकसानीचं ठरलं. तो सिनेमा
म्हणजे लगान.
आशुतोष गोवारिकर यांचा लगान हा सिनेमा त्या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या सिनेमात आमिर खानची मुख्य भूमिका होती. आमिरने या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.मात्र, तुम्हाला माहितीये भुवनच्या या भूमिकेसाठी आमिर खान नाहीतर अभिषेक दिग्दर्शकाची पहिली पसंती होता.परंतु, अभिनेत्याने ही ऑफर नाकारली. एक-दोनदा नाहीतर दिग्दर्शकांनी अभिषेकला तब्बल १२ वेळा विचारणा केलेली, पण प्रत्येक वेळी त्याने नकारच दिला. एका मुलाखतीमध्ये आशुतोष गोवारिकर याबद्दल खुलासा केला होता.
अभिषेकने का नाकारली ऑफर?
दरम्यान,लगान सिनेमाची ऑफर का नाकारली होती, याचं स्पष्टीकरण देताना अभिषेक म्हणालेला," लगानसारख्या मोठ्या चित्रपटासाठी मी खूप नवीन आणि लहान होतो. अर्थात, हा चित्रपट खूप मोठा आहे याची मला जाणीव होती, पण मी त्याचा भाग व्हायला तयार नव्हतो.” हा चित्रपट नाकारला याबद्दल मनात कोणतीही खंत नसल्याचंही तो म्हणाला होता.