VIDEO: दिन दिन दिवाळी! आमिर खानच्या जावयाची धमाल; आईसह पत्नीलाही नाचवलं, हूक स्टेपने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 13:39 IST2024-11-02T13:33:50+5:302024-11-02T13:39:30+5:30

सोशल मीडियावर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खानचा जावई नुपूर शिखरेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

bollywood actor aamir khan son in law and daughter ira dance on din din diwali song video viral | VIDEO: दिन दिन दिवाळी! आमिर खानच्या जावयाची धमाल; आईसह पत्नीलाही नाचवलं, हूक स्टेपने वेधलं लक्ष

VIDEO: दिन दिन दिवाळी! आमिर खानच्या जावयाची धमाल; आईसह पत्नीलाही नाचवलं, हूक स्टेपने वेधलं लक्ष

Nupur Shikhare Video: सध्या दिवाळीनिमित्त (Diwali) सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून आकर्षक आकाशकंदील, रांगोळी आणि रोषणाईच्या झगमगाट लक्ष वेधून घेत आहे. या धामधुमीत सगळेच आनंद लूटताना दिसत आहेत. यात कलाकार मंडळीही कुठे मागे नाही. सध्या सोशल मीडियावरबॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) जावई नुपूर शिखरेचा (Nupur Shikhare) एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.


दिवाळीनिमित्त नुपूर शिखरेने त्याची आई आणि पत्नीसह केलेल्या डान्सचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये नुपूर त्याच्या कुटुंबियांसोबत दिन दिन दिवाळी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतो आहे. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. नुपूरचा हा धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाल केला आहे.

नुपूर शिखरे, आयरा खानसह तिच्या सासुबाई प्रितम शिखरे व्हिडीओमध्ये ठेका धरल्याचं पाहायला मिळतंय. आयराची सासू प्रितम शिखरे यादेखील एक नृत्यांगणा आहेत. त्यांनी कथ्थक नृत्यप्रकारचं प्रशिक्षण घेतलं असून अनेकांना त्या नृत्याचे धडेही देतात. युट्यूब चॅनेलवरही त्या डान्सचे अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी सुश्मिता सेनलाही कथ्थकचं प्रशिक्षण दिलं होतं. आयरा आणि नुपूरने ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर १० जानेवारीला ख्रिश्चन पद्धतीने लग्न करत त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Web Title: bollywood actor aamir khan son in law and daughter ira dance on din din diwali song video viral