चित्रपट फ्लॉप झाल्याने डिप्रेशनमध्ये गेला होता आमिर खान, 'अशी' दिली कुटुंबियांनी साथ, खुलासा करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:31 IST2026-03-24T16:27:41+5:302026-03-24T16:31:12+5:30

"लोकांना सिनेमा कळलाच नाही...",'लाल सिंह चढ्ढा' च्या अपयशावर आमिर खान झाला व्यक्त, म्हणाला...

bollywood actor aamir khan opens up about laal singh chaddha movie failure says | चित्रपट फ्लॉप झाल्याने डिप्रेशनमध्ये गेला होता आमिर खान, 'अशी' दिली कुटुंबियांनी साथ, खुलासा करत म्हणाला...

चित्रपट फ्लॉप झाल्याने डिप्रेशनमध्ये गेला होता आमिर खान, 'अशी' दिली कुटुंबियांनी साथ, खुलासा करत म्हणाला...

Aamir Khan:बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा त्याच्या चित्रपटांमुळे कायम चर्चेत असतो. त्याचे सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर असतात. आमिर खान सध्या त्याचा मुलगा जुनैद खानच्या 'एक दिन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्याची निर्मिती आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत झाली आहे. दरम्यान, आमिर खानची मुख्य भूमिका असलेला लाल सिंह चढ्ढा हा सिनेमा ११ ऑगस्ट २०२२ साली प्रदर्शित झाला होता.मात्र, या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. 

नुकतंच आमिर खानने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये लाल सिंह चढ्ढाच्या अपयशावर भाष्य केलं आहे.  लाल सिंह चढ्ढा फ्लॉप झाल्यामुळे तो नैराश्यात गेला होता. यावेळी  आमिरने स्पष्ट केलं की 'लाल सिंग चड्ढा'चं अपयश 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'च्या अपयशापेक्षा कसे पूर्णपणे वेगळे होतं. त्यामुळे 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाचा त्याच्यावर अधिक परिणाम झाला. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेता म्हणाला, "'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चालला नाही तेव्हा मला काहीच वाटलं नाही कारण  तो चित्रपट मला सुद्धा आवडला नव्हता. त्यामुळे प्रेक्षक आणि माझे विचार थोडेफार  जुळत होते.पण लाल सिंह चढ्ढा सिनेमा मला खूप आवडला होता. हा एक उत्तम सिनेमा आहे, असं मला वाटतं. "

लाल सिंह चढ्ढाच्या अपयशावर आमिर खान काय म्हणाला?

त्यानंतर मग आमिर मनातील भावना व्यक्त करत म्हणाला, "जेव्हा 'लाल सिंह चड्ढा' पहिल्यांदा प्रदर्शित झाला, तेव्हा बहुतेक जण चित्रपटगृहात आले नाहीत. बऱ्याच लोकांना 'लाल सिंह चड्ढा' आवडला, पण मला हेही माहीत आहे की अनेकांना तो चित्रपट कळलाच नाही. पण तसा विचार करणं चुकीचं ठरेल. कारण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट फ्लॉप होणं अशक्यच आहे. मला नक्कीच वाईट वाटलं, कारण तो चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. आदित्य चोप्राने त्यात खूप पैसे गुंतवले होते. तो एक उत्तम निर्माता आहे. त्याने त्या चित्रपटासाठी खूप काही केलं होतं."

'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशामुळे आमिर पूर्णपणे खचून गेला होता. तो म्हणाला, "मी खूप दुःखी, निराश झालो होतो. पहिले काही महिने माझ्यासाठी खूप वेदनादायी होते, पण नंतर मी त्यातून स्वतःला सावरलं. मला वाटतं, माझा स्वभावच तसा आहे."

कुटुंबियांनी अशी दिली साथ ...

या मुलाखतीत आमिरने या काळात त्याच्या कुटुंबियांनी कशी साथ दिली याबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "जेव्हा 'लाल सिंह चढ्ढा' चालला नाही, तेव्हा माझ्या बहिणी मला भेटायला यायच्या. माझी आईसुद्धा यायची. माझी मुलंही यायची. किरणसुद्धा ये-जा करत असे. रीना सारखी विचारायची, "तू कसा आहेस? ठीक आहेस ना?" मला वाटायचं, "माझ्या आयुष्यात मला इतकं लक्ष कधीच मिळालं नाही. एखादा चित्रपट फ्लॉप झाल्यावर जर मला माझ्या कुटुंबाकडून इतकं लक्ष मिळालं असतं, तर मी अजून दोन-तीन फ्लॉप चित्रपट केले तरी हरकत नाही."

Web Title : फ़िल्म फ्लॉप होने पर आमिर खान डिप्रेशन में, परिवार का खुलासा

Web Summary : 'लाल सिंह चड्ढा' के फ्लॉप होने के बाद आमिर खान ने अपनी निराशा व्यक्त की। उन्होंने 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' की विफलता से इसे अलग बताया और परिवार के समर्थन पर जोर दिया, जिसमें उनकी माँ, बहनें, बच्चे और पूर्व पत्नियाँ शामिल थीं।

Web Title : Aamir Khan Depressed After Film Flop, Family Support Revealed

Web Summary : Aamir Khan revealed his depression after 'Laal Singh Chaddha' flopped. He distinguished it from 'Thugs of Hindostan's' failure and emphasized the family support he received during that difficult period, including visits and concern from his mother, sisters, children and ex-wives.