टॉपलेस फोटोशूट, अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे उधवस्त झालं करिअर, सध्या कुठे आहे ही अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 17:38 IST2024-04-22T17:35:56+5:302024-04-22T17:38:18+5:30
९० च्या दशकात आपल्या अभिनयाने तसेच सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी. परंतु चित्रपटांखेरीज या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त ठरलं.

टॉपलेस फोटोशूट, अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे उधवस्त झालं करिअर, सध्या कुठे आहे ही अभिनेत्री?
Mamta Kulkarni : 'मुझको राणा जी माफ करना' या गाण्याचे बोल कानावर पडले की आपसुकचं अभिनेत्री ममता कुलकर्णीचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. ममता कुलकर्णी ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री होती. हिंदी सिनेसृष्टीला तिने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले. दमदार अभिनय तसेच निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने चाहत्यांना आपलंस केलं. पण ममता तिच्या कामापेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत आली. आज भलेही अभिनेत्री सिनेसृष्टीपासून लांब असली तरी तिच्या चित्रपटांची नेहमीच चर्चा होत असते.
१९९२ मध्ये आलेल्या 'तिरंगा' या चित्रपटातून तिने हिंदी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यांनंतर ममताने 'आशिक', 'आवारा', 'क्रांतिवीर', 'वक्त हमारा हैं', 'सबसे बडा खिलाडी' तसेच 'करण अर्जुन' यांसारखे हिट सिनेमे दिले. यशाच्या शिखरावर असताना अचानक तिच्या करिअरला उतरती कळा लागली. सध्या अभिनेत्री संन्यासी जीवन जगतेय. तिने आपला मार्ग अध्यात्माकडे वळवल्याचं सांगण्यात येतंय.
टॉपलेस फोटोशूटमुळे भरावा लागला दंड-
ममताने साल १९९३ मध्ये केलेल्या एका टॉपलेस फोटोशूटमुळे ती चर्चेत आली होती. त्यावेळेस बोल्ड फोटोशूट करणं तिला चांगलच महागात पडलं. या बोल्ड फोटोशूटसाठी तिला १५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता.
अंडरवर्ल्ड कनेक्शमुळे करिअर धुळीस मिळालं-
फक्त टॉपलेस फोटोशूटच नाही तर अंडरवर्ल्डसोबत असलेल्या नात्यामुळे देखील ती वादात अडकली होती. आपलं अंडरवर्ल्डसोबत असलेल्या नात्यावर ममताने कायम मौन बाळगलं होतं. पण अचानक तिने ड्रग्ज माफियासोबत लग्न केल्यानं एकच खळबळ उडाली. त्यानंतर अभिनेत्री ममता कुलकर्णी बॉलिवूडमधून गायब झाली.