"तू असे चित्रपट करु नकोस" Animal पाहिल्यानंतर बॉबी देओलची आई असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:20 PM2023-12-06T12:20:00+5:302023-12-06T12:20:25+5:30

बॉबीच्या कामामुळे त्याचे चाहते इतके उत्साहित असतानाच त्याच्या आईने मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. 

Bobby Deol s mother Prakash Kaur reaction after watching Animal movie says dont do such films | "तू असे चित्रपट करु नकोस" Animal पाहिल्यानंतर बॉबी देओलची आई असं का म्हणाली?

"तू असे चित्रपट करु नकोस" Animal पाहिल्यानंतर बॉबी देओलची आई असं का म्हणाली?

एकेकाळी चॉकलेट हिरो म्हणून लोकप्रिय झालेला अभिनेता बॉबी देओलने (Bobby Deol) Animal सिनेमातून दमदार कमबॅक केले आहे. बॉबीची क्रेझ परत आली आहे. जो तो बॉबीची भरभरुन स्तुती करताना दिसतोय. आधी 'आश्रम' वेबसिरीज आणि आता Animal सिनेमातून बॉबीने आपलं टॅलेंट सिद्ध केलं आहे. बॉबीच्या कामामुळे त्याचे चाहते इतके उत्साहित असतानाच त्याच्या आईने मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. 

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित Animal सिनेमात बॉबी देओलला अगदीच कमी स्क्रीनटाईम आहे. मात्र तरी त्याने इतक्या कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलंय. त्याचा फिटनेस तर वाखणण्याजोगा आहे. नुकतंच संपूर्ण देओल कुटुंबाने Animal सिनेमा पाहिला. धर्मेंद्र यांनी लेकाचं खूप कौतुक केलं. मात्र बॉबीची आई प्रकाश कौरची प्रतिक्रिया चर्चेत आहे. बॉबी म्हणाला, 'सिनेमात मृत्यू झालेला माझा सीन आईला सहन झाला नाही. ती म्हणाली असे चित्रपट नको करु मला बघवत नाही.' मी तिला म्हणालो,'बघ मी तुझ्यासमोर उभा आहे. ती तर फक्त एक भूमिका आहे'.

बॉबी पुढे म्हणाला,'भले माझ्या आईला तो सीन बघून वाईट वाटलं असेल पण ती माझं यश बघून खूप खूश आहे. तिला तिच्या मित्रपरिवाराचे फोन येत आहेत. त्या सगळ्यांनाच मला भेटण्याची इच्छा आहे. जेव्हा आश्रम सीरिज आली होती तेव्हाही असंच झालं होतं.'

Animal सिनेमाने सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. १४ सिनेमांचा रेकॉर्ड Animal ने चारच दिवसात मोडला आहे. बाहुबली, पठाण, जवान या सर्वच ब्लॉकबस्टर चित्रपटांना Animal ने मागे टाकले आहे. शाहरुख, सलमान असो किंवा प्रभास या सगळ्यांवर रणबीर कपूर भारी पडला आहे.

Web Title: Bobby Deol s mother Prakash Kaur reaction after watching Animal movie says dont do such films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.