VIDEO : गरीब लेकरांनी पैसे मागताच 500 रुपयांच्या नोटा दिल्या काढून, नेटकरी कौतुक करता थांबेना, म्हणाले - 'हाच खरा लॉर्ड बॉबी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 09:38 AM2024-03-22T09:38:17+5:302024-03-22T09:41:14+5:30

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. 'आश्रम' या वेब सीरिजमधून बॉबीने ...

bobby deol gave money 500 hundred rupees to poor kids kanguva actor latest video viral | VIDEO : गरीब लेकरांनी पैसे मागताच 500 रुपयांच्या नोटा दिल्या काढून, नेटकरी कौतुक करता थांबेना, म्हणाले - 'हाच खरा लॉर्ड बॉबी'

VIDEO : गरीब लेकरांनी पैसे मागताच 500 रुपयांच्या नोटा दिल्या काढून, नेटकरी कौतुक करता थांबेना, म्हणाले - 'हाच खरा लॉर्ड बॉबी'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. 'आश्रम' या वेब सीरिजमधून बॉबीने पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलं. या सीरिजमधील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. त्यानंतर अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' चित्रपटामुळे बॉबी चर्चेत आला होता.  या चित्रपटाच्या अफाट यशानंतर बॉबी काय चर्चेत येत आहे. यातच आता बॉबीचा एक ताजा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

बॉबी देओल त्याच्या साधेपणासाठी आणि मोठ्या मनासाठी ओळखला जातो.  सेलेब्स फोटोग्राफर पल्लव पालीवालने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर बॉबीचा एक लेटेस्ट व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात बॉबी देओल दोन गरीब मुलांना 500-500 रुपये देताना दिसत आहे. चाहत्यांकडून त्याच्या व्हिडीओला खूप पसंत केलं जात आहे. व्हिडीओमध्ये दिसतं बॉबीला दोन गरीब मुल घेरतात आणि पैसे मागतात. यातच बॉबी  खिशातून 500-500 रुपयांची नोट काढतो आणि या दोन लहान मुलांना देतो. त्यानंतर मुलं आनंदी झाल्याचं दिसून येतं. 

एवढेच नाही तर बॉबी देओलने या दोन मुलांसोबत क्लिक केलेले फोटोही पाहायला मिळाले. या व्हिडीओवर कमेंट करताना चाहत्यांनी अभिनेत्याला 'रियल लॉर्ड बॉबी' अशी उपाधी देत ​​आहेत आणि त्याचं खूप कौतुक करत आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ॲनिमल' या चित्रपटानंतर बॉबी देओल कांगुवा या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत साऊथचा सुपरस्टार सूर्या आहे. नुकताच कांगुवाचा धमाकेदार टीझरही रिलीज झाला आहे, जो पाहून चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
 

Web Title: bobby deol gave money 500 hundred rupees to poor kids kanguva actor latest video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.