"माझं घर तोडलं, आज त्यांचं गर्वहरण झालं"; उद्धव ठाकरेंच्या पराभवानंतर कंगना रणौतची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 08:17 IST2026-01-17T08:15:45+5:302026-01-17T08:17:53+5:30

महानगर पालिकेतील विजयानंतर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

BMC Election Result 2026 : "My house was demolished, today his pride was taken away"; Kangana Ranaut's blunt criticism after Uddhav Thackeray's defeat | "माझं घर तोडलं, आज त्यांचं गर्वहरण झालं"; उद्धव ठाकरेंच्या पराभवानंतर कंगना रणौतची बोचरी टीका

"माझं घर तोडलं, आज त्यांचं गर्वहरण झालं"; उद्धव ठाकरेंच्या पराभवानंतर कंगना रणौतची बोचरी टीका

मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीचा निकाल समोर आला असून, महायुतीने मुंबईवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ठाकरे कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंबईत आता भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचा महापौर बसणार आहे. या विजयानंतर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "माझं घर तोडणाऱ्यांना आता जनतेनेच सत्तेतून बेदखल केलं," अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

'आज महाराष्ट्रानं त्यांना सोडलं'

मुंबई महापालिकेच्या निकालावर प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाली की, हा निकाल म्हणजे माझ्यासाठी न्याय आहे. २०१० मध्ये बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईची आठवण करून देत ती म्हणाली, "ज्यांनी मला शिवीगाळ केली, माझं घर पाडलं आणि मला महाराष्ट्र सोडण्याची धमकी दिली, आज त्याच महाराष्ट्राने त्यांना सोडून दिले आहे. काळ कोणासाठीच थांबत नाही, आज निसर्गाने न्याय केला आहे."

नेपोटिझम आणि माफियावर प्रहार

कंगना पुढे म्हणाली की, "महिलांचा द्वेष करणाऱ्या आणि नेपोटिझम माफियाला जनतेने त्यांची खरी जागा दाखवून दिली आहे, याचा मला मनापासून आनंद आहे." तिने एनडीटीवीशी बोलताना या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप कार्यकर्त्यांना दिले. या 'भगव्या लाटे'मुळे मुंबईत एका नवीन युगाची सुरुवात झाल्याचेही तिने नमूद केले.

'उद्धव ठाकरे, आज तुमचं गर्वहरण झालं!'

सोशल मीडियावर सध्या कंगनाचा २०२० मधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यावेळी तिचे कार्यालय पाडण्यात आले होते, तेव्हा तिने उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले होते, "उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून मोठा सूड घेतलात? लक्षात ठेवा, आज माझं घर तुटलंय, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे काळाचं चक्र आहे, ते फिरत राहतं." आजच्या निकालानंतर कंगनाचे ते शब्द खरे ठरल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

Web Title : मुंबई में भाजपा की जीत के बाद कंगना ने उद्धव ठाकरे पर साधा निशाना।

Web Summary : मुंबई में भाजपा की जीत के बाद कंगना रनौत ने उद्धव ठाकरे की आलोचना करते हुए इसे अपनी ध्वस्त संपत्ति के लिए न्याय बताया। उन्होंने उन पर भाई-भतीजावाद और महिला विरोधी होने का आरोप लगाया, और जीत का श्रेय मोदी और फडणवीस को दिया।

Web Title : Kangana Ranaut slams Uddhav Thackeray after BJP's Mumbai win.

Web Summary : Kangana Ranaut criticized Uddhav Thackeray after BJP's Mumbai victory, calling it justice for her demolished property. She accused him of nepotism and anti-women bias, crediting Modi and Fadnavis for the win and a new era in Mumbai.