नशेत तर्र जॅकी श्रॉफने तब्बूसोबत केले होते असे काही, बहिणीने केला होता धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 08:00 IST2020-11-04T08:00:00+5:302020-11-04T08:00:02+5:30
होय, तब्बूने त्या घटनेवर मौन बाळगणे पसंत केले. पण तब्बूची मोठी बहिण फराह नाज हिने याबाबत खुलासा केला होता.

नशेत तर्र जॅकी श्रॉफने तब्बूसोबत केले होते असे काही, बहिणीने केला होता धक्कादायक खुलासा
आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री तब्बू हिचा आज वाढदिवस. 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबाद येथे तब्बूचा जन्म झाला. वयाच्या उण्यापु-या 15 व्या वर्षी तब्बू इंडस्ट्रीत आली आणि इथलीच बनून राहिली. ( तब्बूने तिच्या फिल्म करिअरची सुरुवात 15 व्या वर्षी केली होती. 1985 मध्ये प्रदर्शित झालेला ‘हम नौजवान’ या सिनेमात तिने देव आनंद यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. )
आपल्या फिल्मी करिअरमध्ये तब्बूने अनेक हिट चित्रपट दिलेत. तिचे पर्सनल लाईफही चर्चेत राहिले. आजही अविवाहित असलेल्या तब्बूचे साऊथ सुपरस्टार नागार्जुनसोबतचे अफेअर चांगलेच गाजले होते. शिवाय तिच्या आयुष्यातील एका घटनेचीही बरीच चर्चा तेव्हा रंगली होती. तब्बू यावर कधीच बोलली नाही. कदाचित तब्बू यावर बोलली असती तर एका अभिनेत्याचे करिअर उद्धवस्त झाले असते. तो अभिनेता कोण तर जॅकी श्रॉफ.
होय, तब्बूने त्या भयावह घटनेवर मौन बाळगणे पसंत केले. पण तब्बूची मोठी बहिण फराह नाज हिने याबाबत खुलासा केला होता.
1986 मध्ये फराह आणि जॅकी श्रॉफ ‘दिलजला’ फिल्मचे शूटिंग करत होते. त्याकाळात तब्बू नेहमी आपल्या बहिणीसोबत सेटवर जात होती. या फिल्म मध्ये डॅनी खलनायकाच्या भूमिकेत होता. शूटिंग संपल्यानंतर सगळी स्टारकास्ट डॅनीच्या घरी पार्टी करायचे. एकदिवस फराह तब्बूसोबत या पार्टीला गेली. जॅकीही या पार्टीत होता. पण जॅकीने एवढी दारू प्यायली होती, की तो तब्बूसोबत बळजबरी करायला लागला.
फराहने एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला होता. ‘डॅनी तब्बूला वाचवण्यासाठी पुढे आले नसते तर जॅकीने तब्बूला बदनाम करण्याचेच ठरवले होते,’ असे फराह म्हणाली होती. तब्बूने कधीही या घटनेचा उल्लेख केलेला नाही. ही घटना घडली तेव्हा तब्बू तेव्हा 14- 15 वर्षांची असावी. हेच कारण आहे की, आपल्या अख्ख्या करिअरमध्ये तब्बूने बहुतेक सर्वच अभिनेत्यांसोबत काम केले आहे, मात्र आजपर्यंत तिने आतापर्यंत जॅकी श्रॉफसोबत काम केलेले नाही.
या विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती तब्बू
तब्बू आजही अविवाहित असली तरी तिचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. संजय कपूर, साजिद नाडियाडवाला आणि नागार्जुन यांच्यासोबत तब्बूच्या अफेअरच्या चर्चा ब-याच रंगल्या. नागार्जुनसोबतचे तिच्या अफेअरची चर्चा तर प्रचंड रंगली. म्हणतात की, दोघांचेही नाते १५ वर्षे चालले. अर्थात दोघांचेही लग्न होऊ शकले नाही. याचे कारण म्हणजे, नागार्जुन विवाहित होते. नागागर्जुन विवाहित होते. पण तब्बू त्यांच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, तिने मुंबई सोडून हैदराबादेत नागार्जुन राहायचे अगदी तिथेच घर घेतले होते.
तब्बूने अनेक वर्षे नागार्जुन यांची प्रतीक्षा केली. पण नागार्जुन पत्नीला घटस्फोट राजी नव्हते. अखेर तब्बूने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आणि २०१२ मध्ये दोघेही कायमचे वेगळे झाले. ९० च्या दशकात तब्बूचे नाव साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत जुळले. या नात्यांच्या बातम्यांनी बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. पण तब्बूच्या मित्रांच्या मते, या निव्वळ अफवा होत्या. तब्बू दिव्या भारतीची मैत्रिण होती आणि त्यामुळे ती साजिदची मदत करत होती. जेणेकरून दिव्याच्या मृत्यूनंतर तिच्या आठवणीतून साजिदला बाहेर काढू शकेल.