Birthday Special : बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणला आजही वाटते या गोष्टींची भीती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 06:00 AM2019-04-02T06:00:00+5:302019-04-02T06:00:05+5:30

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याचा आज (२ एप्रिल) वाढदिवस. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशी अजयची ओळख आहे. अजयने कॉमेडी, अ‍ॅक्शन असे सगळ्या धाटणीचे चित्रपट केले. पण ‘सिंघम’ या चित्रपटानंतर अ‍ॅक्शन स्टार हीच त्याची ओळख रूढ झाली.

Birthday Special: know about the things about ajay devgn real life | Birthday Special : बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणला आजही वाटते या गोष्टींची भीती!!

Birthday Special : बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणला आजही वाटते या गोष्टींची भीती!!

googlenewsNext
ठळक मुद्दे अजय रिअल लाईफमध्ये अतिशय मितभाषी आहे. पण सुरुवातीपासून स्टंट करण्याचा छंद त्याला होता.

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याचा आज (२ एप्रिल) वाढदिवस. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशी अजयची ओळख आहे. अजयने कॉमेडी, अ‍ॅक्शन असे सगळ्या धाटणीचे चित्रपट केले. पण ‘सिंघम’ या चित्रपटानंतर अ‍ॅक्शन स्टार हीच त्याची ओळख रूढ झाली. रिल लाईफमधला हाच‘सिंघम’ रिअल लाईफमध्ये अनेक गोष्टींना घाबरतो, असे म्हटले तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे.



प्रत्येकाच्या मनात कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दलची भीती असते. आपण या भीतीला फोबिया म्हणून ओळखतो. अजयलाही अनेक गोष्टींबद्दल फोबिया आहे. हेच कारण आहे की, अजय आजही अनेक गोष्टींना घाबरतो. होय, आज अजय बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून मिरवत असला तरी त्याला मुलाखती द्यायची भीती वाटते. केवळ इतकेच नाही तर डान्स आणि पार्टीला जाण्याचीही त्याला भीती वाटते. त्यामुळे या गोष्टी तो शक्य तेवढ्या टाळतो.



अजयला मुलाखत द्यायची भीती वाटते, डान्स करताना तो घाबरतो आणि पार्टीत जायचे म्हटले की, त्याला नको इतके दडपण येते. त्याला आवडते ते केवळ आपल्या मुलांसोबत खेळणे आणि बाईक राईडिंग. फावल्या वेळात अजय याच दोन गोष्टी करतो.



अजय रिअल लाईफमध्ये अतिशय मितभाषी आहे. पण सुरुवातीपासून स्टंट करण्याचा छंद त्याला होता. अजयचे वडील वीरू देवगण स्टंटमॅन होते. अजय वडिलांसोबत सेटवर जायला. सेटवरचे स्टंट पाहून अजय कॉलेजातही अनेक धोकादायक स्टंट करायचा. विश्वास बसणार नाही. पण कॉलेजच्या दिवसांत काही लोक त्याला ‘गुंड’ म्हणून ओळखायचे. अर्थात अजयचे मानाल तर खऱ्या आयुष्यात त्याने कधीही गुंडगिरी केली नाही.

Web Title: Birthday Special: know about the things about ajay devgn real life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.