कतरिनासोबत बिपाशा बासूचा होता ३६चा आकडा, म्हणाली - "करीनाला भेटेन पण हिला नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:45 IST2025-07-31T17:45:11+5:302025-07-31T17:45:39+5:30
Bipasha Basu And Katrina Kaif: बिपाशा बासू आणि कतरिना कैफ यांच्यातही ३६चा आकडा होता. बिपाशा आणि कतरिना यांचे चांगले संबंध नव्हते. बिपाशा बसूने कतरिना कैफबद्दल एक वक्तव्यही केले होते, जे सध्या चर्चेत आहे.

कतरिनासोबत बिपाशा बासूचा होता ३६चा आकडा, म्हणाली - "करीनाला भेटेन पण हिला नाही..."
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींमध्ये कॅटफाइट सुरू असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्यातही ३६चा आकडा होता. बिपाशा आणि कतरिना यांचे चांगले संबंध नव्हते. बिपाशा बसूने कतरिना कैफबद्दल एक वक्तव्यही केले होते, जे सध्या चर्चेत आहे.
२००० मध्ये बिपाशा बासू करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये दिसली होती. तिथे बिपाशा म्हणाली होती की, ''जर मी एखाद्या कार्यक्रमात करीनाला भेटले तर मी तिचे चांगले स्वागत करेन पण कतरिनाचे नाही.'' बॉलिवूड शादीसच्या रिपोर्ट्सनुसार, बिपाशा आणि कतरिना यांच्यात कोणतेही नाते नव्हते. असे वृत्त होते की, सलमानच्या मदतीने बिपाशा बासूला चित्रपटांमध्ये कतरिनाने बदलले.
कतरिनाने बिपाशाबद्दल म्हणालेली...
२००८ मध्ये जेव्हा कतरिना कैफ कॉफी विथ करणमध्ये पोहोचली तेव्हा करण जोहरने तिला बिपाशासोबतच्या तिच्या मतभेदाबद्दल विचारले. त्याने कतरिनाला सांगितले की बिपाशा आणि ती एकमेकांशी बोलत नाहीत आणि एकमेकांकडे पाहत नाहीत. यावर कतरिनाने म्हटले, ''तुम्ही तिला हे विचारावे. मी माझ्या बाजूने गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. शेवटी, मी येथे काम करण्यासाठी आले आहे आणि मला खात्री आहे की तीदेखील इथे काम करण्यासाठी आली आहे. ती इंडस्ट्रीत खूप मेहनत घेत आहे. तिला नक्कीच इथेच राहायचे आहे.''
वैयक्तिक आयुष्यात, बिपाशा बासूचे लग्न करण सिंग ग्रोव्हरशी झाले आहे. तर कतरिना कैफने विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधलीय. विकी आणि कतरिनाचे लग्न २०२१ मध्ये झाले.