गर्लफ्रेंडने गिटार दिलं, 'त्याने' स्वत:ला सिद्ध करून दाखवलं; स्वप्न पूर्ण करत बॉलिवूडमध्ये धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 14:38 IST2023-02-27T14:37:10+5:302023-02-27T14:38:42+5:30
अमरजीतने आपल्या यशाचे श्रेय गर्लफ्रेंडला दिलं आहे.

गर्लफ्रेंडने गिटार दिलं, 'त्याने' स्वत:ला सिद्ध करून दाखवलं; स्वप्न पूर्ण करत बॉलिवूडमध्ये धडक
नशीब बदलायला वेळ लागत नाही, मेहनतीसोबतच जिद्द हवी. अमरजीत जाकर यांची अशीच प्रेरणादायी गोष्ट आता देशभर प्रसिद्ध झाली आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने त्याला त्याच्या चित्रपटात गाण्याची ऑफर दिली आहे. त्याचे गातानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मोठ्या गायकांनी त्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. घरी फोन येण्यासही सुरुवात झाली आहे
अमरजीतने आपल्या यशाचे श्रेय त्याच्या गर्लफ्रेंडला दिलं आहे. फेसबुकवर एक मुलगी त्याची फॅन होती आणि नंतर तो तिच्याच प्रेमात पडला. मुलीने त्याला आणखी गाणी आणि व्हिडीओ अपलोड करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. गिटारही दिलं. अमरजीत बिहारमधील एका गरीब कुटुंबातील आहे. त्याचे वडील आणि आजोबा एक छोटं दुकान चालवतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अमरजीतने स्वत:च्या कमाईतून घरी गॅसची शेगडी आणली. पूर्वी चुलीवर अन्न शिजवले जात असे.
अमरजीतचे वडील सांगतात की ते पदवीधर आहेत, पण नोकरी मिळू शकली नाही. त्यांना गायनाचीही आवड होती, पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यात करिअर करता आले नाही. पण आता ते आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण सहकार्य करत आहेत. अमरजीतच्या आई आणि आजीनेही आनंद व्यक्त केला आहे. अमरजीतला लोक वेडा म्हणायचे, असे त्याची आई सांगते. तो वेड्यासारखा गातोय असे म्हणत त्याची खिल्ली उडवत असे. लोकांचे टोमणे टाळण्यासाठी तो छतावर किंवा इतर ठिकाणी लपून गाणी म्हणू लागला.
अमरजीत म्हणतो की, "त्याला शो करण्याऐवजी 6000 रुपये मिळाले. यासोबत त्याने गॅसची शेगडी आणली. तेव्हापासून त्याची आई त्याला साथ देऊ लागली. तो काहीतरी करेल अशी आशा संपूर्ण कुटुंबाला आहे.आपल्या प्रेयसीबद्दल अमरजीत म्हणाला की 'मी डिप्रेशनमध्ये असताना तिने माझी काळजी घेतली. दोघांची फेसबुकवर भेट झाली. आता ती त्याची गर्लफ्रेंड आहे. तिने गिटार दिलं. आधीही सपोर्ट केला आणि आताही करते. घरच्यांनाही याची माहिती आहे. आज मी जे काही करतोय ते फक्त तिच्यामुळेच आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"