Bigg Boss OTT ला मिळाली पहिली विजेती, दिव्या अग्रवालने २५ लाख रुपयांसह विजेतेपदावर केला कब्जा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 23:47 IST2021-09-18T23:46:38+5:302021-09-18T23:47:34+5:30
(Bigg Boss OTT, Divya Agarwal : बिग बॉस ओटीटीच्या विजेत्याची घोषणा अखेर झाली आहे. बिग बॉस ओटीटीचे विजेतेपद दिव्या अग्रवाल हिने जिंकले आहे. तर निशांत फर्स्ट रनर राहिला.

Bigg Boss OTT ला मिळाली पहिली विजेती, दिव्या अग्रवालने २५ लाख रुपयांसह विजेतेपदावर केला कब्जा
मुंबई - बिग बॉस ओटीटीच्या विजेत्याची घोषणा अखेर झाली आहे. बिग बॉस ओटीटीचे विजेतेपद दिव्या अग्रवाल हिने जिंकले आहे. तर निशांत फर्स्ट रनर राहिला. विजेत्या दिव्याला चषकासह २५ लाख रुपयांचं बक्षिस देण्यात आलं आहे. ((Bigg Boss OTT ) शनिवारी झालेल्या बिग बॉस ओटीटीच्या अंतिम फेरीत एकूण चार स्पर्धक पोहोचले होते. दिव्या अग्रवाल, शमिता, राकेश आणि निशांत. तर प्रतीक सहजपाल २५ लाख रुपये घेऊन विजेत्यांच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. अखेर दिव्याने शमिता, राकेश आणि निशांतला पराभूत करून विजेतेपद पटकावले. (Bigg Boss OTT gets first winner, Divya Agarwal captures title with Rs 25 lakh)
दिव्या अग्रवाल अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने रागिनी एमएमएस रिटर्न्स वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. तसेच ती बिग बॉसमधील माजी स्पर्धक प्रियांक शर्मा याच्यासोबत नात्यामध्ये राहिली आहे. त्यानंतर दोघेही वेगळे झाले होते. दोघांचे ब्रेक अप प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता.
बिग बॉस ओटीटीच्या अंतिम फेरीसाठी निर्मात्यांनी जोरदार तयारी केली होती. अंतिम फेरीत शमिता शेट्टी, राकेश बापट, दिव्या अग्रवाल, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांच्यामधून एक जण विजेता बनणार होता. अखेर यामध्ये दिव्या अग्रवाल हिने बाजी मारली.