'स्त्री २' फेम अभिनेत्याला सलमानच्या शोची ऑफर, स्वत:च केला गौप्यस्फोट, म्हणाला, "मला बिग बॉसकडून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 10:15 IST2024-08-28T10:14:44+5:302024-08-28T10:15:05+5:30

'स्त्री २' फेम अभिनेत्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार? केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाला, "मला टीमकडून..."

bigg boss 18 stree 2 fame sarkata aka sunil kumar revealed that he get salman khan show offer | 'स्त्री २' फेम अभिनेत्याला सलमानच्या शोची ऑफर, स्वत:च केला गौप्यस्फोट, म्हणाला, "मला बिग बॉसकडून..."

'स्त्री २' फेम अभिनेत्याला सलमानच्या शोची ऑफर, स्वत:च केला गौप्यस्फोट, म्हणाला, "मला बिग बॉसकडून..."

सध्या जिकडेतिकडे राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २' सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. 'स्त्री' सिनेमाप्रमाणेच त्याचा सीक्वलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमाचे शो ठिकठिकाणी हाऊसफूल आहेत. आता 'स्त्री २' सिनेमातील अभिनेत्याला 'बिग बॉस' हिंदीची ऑफर मिळाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे 'स्त्री २' फेम अभिनेत्याच्या 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

'स्त्री २' सिनेमातील सरकटाने प्रेक्षकांची घाबरगुंडी उडाली. सिनेमात ही भूमिका साकारणारा अभिनेता सुनील कुमारला या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. आता सरकटा साकारणारा अभिनेता सुनील कुमारला 'बिग बॉस हिंदी'ची ऑफर मिळाल्याची चर्चा आहे. खुद्द सुनील कुमारनेच याबाबत खुलासा केला आहे. 'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत सुनील कुमारने 'बिग बॉस १८'ची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 'बिग बॉस'च्या टीमकडून नवीन सीझनसाठी विचारणा झाल्याचंही त्याने सांगितलं. 


तो म्हणाला, "मला बिग बॉससाठी कॉल आला होता. ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या बिग बॉससाठी हा कॉल असल्याचं त्यांनी मला सांगितलं". याबरोबरच बिग बॉसमध्ये जाणार की नाही? याबाबतही त्याने भाष्य केलं. "मी सध्या बिग बॉसमध्ये जाण्याचा विचार करत आहे. पण, मी पोलिसांत नोकरी करत असल्याने सुट्टी मिळणं कठीण वाटतंय. मला यासाठी रिक्वेस्ट करावी लागेल. आमचा पोलीस स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे. सिनेमा, जाहिरातीचं शूटिंग किंवा कुस्तीच्या प्रोग्रामसाठी ते मला सुट्टी देतात", असं त्याने सांगितलं. 

त्यामुळे सरकटा म्हणजेच सुनील कुमार 'बिग बॉस'च्या घरात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑक्टोबर महिन्यात 'बिग बॉस १८' सुरू होणार असल्याची चर्चा आहे. यंदाच्या 'बिग बॉस'मध्ये अभिनेता शोएब इब्राहिम दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण, अद्याप त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. 

Web Title: bigg boss 18 stree 2 fame sarkata aka sunil kumar revealed that he get salman khan show offer