ठणठणीत आहेत बिग बी! आजारपणाच्या बातम्यांवर अमिताभ यांनी दिली ही भन्नाट प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 10:47 IST2024-03-16T10:46:30+5:302024-03-16T10:47:43+5:30
अँजिओप्लास्टीच्या बातम्यांवर स्वतः अमिताभ यांनी मौन सोडलंय. काय म्हणाले बिग बी? वाचा एका क्लिकवर

ठणठणीत आहेत बिग बी! आजारपणाच्या बातम्यांवर अमिताभ यांनी दिली ही भन्नाट प्रतिक्रिया
अमिताभ बच्चन यांच्याविषयी शुक्रवारी एक बातमी वेगाने व्हायरल झाली. अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली. यावेळी असेही सांगण्यात आले की, कोकिलाबेन रुग्णालयात बिग बींची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. यानंतर ही बातमी ट्रेंडमध्ये येऊ लागली. परंतु आता स्वतः अमिताभ यांनी त्यांच्या आजारपणाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे.
अँजिओप्लास्टीची बातमी समोर आल्यावर अमिताभ ISPL सामना पाहायला स्टेडियममध्ये उपस्थित होते. नंतर स्टेडिअममधून बाहेर पडताना एका व्यक्तीने अमिताभ यांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारले, त्यानंतर त्यांनी प्रथम हाताने इशारा केला की, ते ठीक आहेत. आणि पुढे त्यांनी ती फेक न्यूज असल्याचे सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ नियमित चेकअपसाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यांची कोणतीही अँजिओप्लास्टी झाली नाही.
या बातम्या समोर आल्यानंतर अमिताभ मुलगा अभिषेकसोबत आयएसपीएल सामन्यादरम्यान स्पॉट झाले. जिथे बिग बींनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी खोटी असल्याचे म्हटले होते. यानंतर सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये अमिताभ मुलगा अभिषेक आणि सचिन तेंडुलकरसोबत बोलताना दिसत आहेत. एकूणच बिग बी ठणठणीत दिसत असल्याने चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला