भूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 17:23 IST2020-01-23T17:22:37+5:302020-01-23T17:23:11+5:30
भूमी पेडणेकर सध्या भोपाळमध्ये शूटिंग करते आहे.

भूमी पेडणेकर करतेय या चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल
भूमी पेडणेकरचा काही दिवसांपूर्वी 'पती पत्नी और वो' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन व अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता तिने दुर्गावती चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. ही माहिती अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर दिली आहे.
दुर्गावती चित्रपटात भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अशोक करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा व भूषण कुमार करत आहे. या चित्रपटाची घोषणा मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये करण्यात आली होती.
या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात झाली आहे. या चित्रपटाचं शूटिंग भोपाळमध्ये होणार आहे. भूमीने इंस्टाग्रामवर दुर्गावतीच्या शूटिंगला भोपाळला जाण्यापूर्वीचा पहिला एक व्हिडिओ शेअर केला होता. तिने भोपाळचे लोकेशन शेअर केले आहे.
दुर्गावती हा थ्रिलर सिनेमा असून यात मुख्य भूमिकेत भूमी पेडणेकर दिसणार आहे. या चित्रपटाचा अक्षय कुमार प्रेझेंटर आहे.
दुर्गावती चित्रपट भागमती चित्रपटाचा रिमेक आहे. भागमतीमध्ये मुख्य भूमिकेत अनुष्का शेट्टी होती. चित्रपटाची कथा हॉरर व सस्पेन्सने परिपूर्ण होती.
भूमी पेडणेकर सध्या तिच्या अफेयरमुळे चर्चेत आहे. भूमी बॉलिवूडच्या एका हिरोच्या प्रेमात पडल्याचे सध्या कानावर येतेय. हा हिरो कोण तर जॅकी भगनानी.
फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, भूमी व जॅकी यांच्यात सध्या एक वेगळेच बॉन्डिंग पाहायला मिळेतय. आत्तापर्यंत या दोघांत केवळ मैत्री होती. पण आता ही मैत्री यापलीकडे गेल्याचे कळतंय. इंटेक्स्ट लाइव्हनं दिलेल्या वृत्तानुसार, आता जॅकी तिला प्रोफेशनल सल्लेदेखील देऊ लागलाय.