भूमी पेडणेकरने दिशा पटानीला म्हटले ‘कच्चा लिंबू’; पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 14:18 IST2019-01-28T14:12:46+5:302019-01-28T14:18:46+5:30
करण जोहरचा लोकप्रीय टीव्ही चॅट शो ‘कॉफी विद करण’चा प्रत्येक एपिसोड वेगवेगळ्या कारणांनी गाजतो. बॉलिवूड सेलिब्रिटी गेस्ट म्हणून या शोमध्ये येतात आणि नवनवे खुलासे होतात.

भूमी पेडणेकरने दिशा पटानीला म्हटले ‘कच्चा लिंबू’; पण का?
करण जोहरचा लोकप्रीय टीव्ही चॅट शो ‘कॉफी विद करण’चा प्रत्येक एपिसोड वेगवेगळ्या कारणांनी गाजतो. बॉलिवूड सेलिब्रिटी गेस्ट म्हणून या शोमध्ये येतात आणि नवनवे खुलासे होतात. काल रविवारी या शोमध्ये भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव पोहोचलेत आणि मग सुरु झाल्या धम्माल गप्पा.
यावेळी बोलताना भूमीने एक वेगळाच खुलासा केला.
होय, यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डायरेक्टर असतानाचा एक किस्सा भूमीने सांगितला आणि सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डायरेक्टर असताना मी राजकुमार राव, रणवीर सिंग, परिणीती चोप्रा, क्रिती सॅनन व दिशा पटानी यांच्या ऑडिशन घेतल्याचे तिने सांगितले. केवळ इतकेच नाही तर, या ऑडिशनदरम्यान मला जे ठीकठीक वाटलेत, ते पुढे गेलेत, असे सांगताना कोण किती गुणांनी पास झाले, याचा खुलासाही तिने केला. ऑडिशनदरम्यान राजकुमार राव ठीकठीक होता तर परिणीती चोप्रा अव्वल होती, असे ती म्हणाली.
ऑडिशनमध्ये ज्यांना तू फेल केलेस आणि ते आज बॉलिवूडमध्ये आहेत, असे कोण? असा प्रश्न केला असता भूमीने थेट दिशा पटानीचे नाव घेतले. सुरुवातीच्या काळात दिशा ‘कच्चा लिंबू’ होती, असे ती म्हणाली. आश्चर्य म्हणजे, भूमीला जी दिशा ‘कच्चा लिंबू’ वाटली, त्याच दिशाच्या नावावर आज दोन सुपरहिट सिनेमे आहेत. विशेष म्हणजे, केवळ दोन वर्षांत तिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
दिशाने २०१६ मध्ये ‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. तुम्हाला ठाऊक आहेच की, हा चित्रपट सुपरहिट राहिला. यानंतर दिशा टायगर श्रॉफसोबत ‘बागी 2’मध्ये दिसली. हा चित्रपटही सुपरहिट राहिला. सध्या ती सलमान खानच्या ‘भारत’मध्ये बिझी आहे.