'तुला सर्जरीची काय गरज?' भूमीचे मोठे ओठ पाहून नेटकरी भडकले; 'त्या' फोटोमुळे अभिनेत्री ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 08:21 IST2023-07-02T08:21:10+5:302023-07-02T08:21:55+5:30

सध्या ती प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळेच जास्त चर्चेत असते. 

Bhumi Pednekar gets trolled netizens suspect she has done lip surgery says she is natural beauty didnt need it | 'तुला सर्जरीची काय गरज?' भूमीचे मोठे ओठ पाहून नेटकरी भडकले; 'त्या' फोटोमुळे अभिनेत्री ट्रोल

'तुला सर्जरीची काय गरज?' भूमीचे मोठे ओठ पाहून नेटकरी भडकले; 'त्या' फोटोमुळे अभिनेत्री ट्रोल

अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) बॉलिवूडमध्ये स्वत:च्या मेहनतीने आणि टॅलेंटच्या जोरावर ओळख बनवली आहे. 'दम लगा के हैश्शा' या आपल्या पहिल्याच सिनेमातून तिने प्रेक्षकांवर छाप पाडली. सहज अभिनय आणि उत्तम स्क्रिप्टवर तिने काम केलं आहे. पण आजकाल भूमी वेगळ्याच कारणाने चर्चेत असते. ते म्हणजे तिचे लुक्स. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने ओठ चांगलेच मोठे दिसत असून सर्जरी केली का असं म्हणत तिला नेटकरी ट्रोल करत आहेत.

भूमीने एक सेल्फी पोस्ट केला आहे. यामध्ये तिचे ओठ स्पष्टपणे मोठे दिसत आहेत. तसंच तिने डीप नेक टॉप घातला आहे. भूमीचा हा लुक नेटकऱ्यांच्या काही पचनी पडलेला दिसत नाही. तिने नक्कीच सर्जरी करुन घेतली आहे अशी शंका चाहत्यांना आली. यामुळे भूमीने नेटकऱ्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. तिचा फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

'प्रियांका चोप्रा जिथे गेली होती तिथेच जाऊन हिने सर्जरी करुन घेतलेली दिसतेय, सर्जरी फेल आहे','तुझं तर नैसर्गिक सौंदर्य आहे तुला अशा सर्जरीची गरजच नाही' अशा प्रतिक्रिया या फोटोवर आल्या आहेत. आजकाल भूमी तिच्या फॅशनमुळेही नेहमी ट्रोल होत असते. विचित्र कपडे घातल्यामुळे तिला लक्ष्य केलं जातं. याशिवाय सध्या तिचे बिल्डर यश कटारियासोबत अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यांचे  एअरपोर्टवरील अनेक व्हिडिओही समोर आले होते.

भूमीने 'टॉयलेट एक प्रेमकथा', 'बधाई दो, 'पती पत्वी और वो', आणि 'गोविंदा नाम मेरा' या सिनेमात काम केलं आहे. याशिवाय नुकतीच ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'अफवाह' या सिनेमात दिसली. सध्या ती प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळेच जास्त चर्चेत असते. 

Web Title: Bhumi Pednekar gets trolled netizens suspect she has done lip surgery says she is natural beauty didnt need it