"आमच्या नात्यात कटुता आली, कारण...", अखेर प्रियदर्शन यांनी सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, १० वर्षांनी उमगली चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:23 IST2026-04-08T13:20:12+5:302026-04-08T13:23:12+5:30
२४ वर्ष संसार अन् नात्याला दिला पूर्णविराम! घटस्फोटाचा 'हेरा फेरी'च्या दिग्दर्शकाला होतोय पश्चाताप? सांगितलं वेगळं होण्याचं कारण

"आमच्या नात्यात कटुता आली, कारण...", अखेर प्रियदर्शन यांनी सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, १० वर्षांनी उमगली चूक
Director Priyadarshan: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक प्रियदर्शन यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही.हेरा फेरी, भुल भुलैया आणि हंगामा यांसारखे सुपहिट चित्रपट इंडस्ट्रीला देणाऱ्या प्रियगदर्शन यांना कॉमेडी चित्रपटांचे बादशाह ही उपाधी देण्यात आली आहे.त्यांनी आजवर बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपल्या दिग्दर्शनाचा ठसा उमटवला आहे. प्रियदर्शन यांच्या चित्रपटांचे जगभरात चाहते आहेत.प्रियदर्शन सध्या त्यांच्या आगामी ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा होताना दिसते.
दरम्यान, दिग्दर्शक प्रियदर्शन घटस्फोटाच्या १० वर्षानंतर त्यांची पत्नी लिसी लक्ष्मीसोबत राहत आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे केवळ त्यांचे जवळचे मित्र आणि इंडस्ट्रीतील सहकारीच नव्हे, तर प्रेक्षकही खूप खूश आहेत.अलिकडेच एका मुलाखतीत प्रियदर्शन यांनी त्यांच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती.आता पुन्हा एकदा त्यांनी घटस्फोटाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितले आहे की सध्या त्याचा पुन्हा लग्न करण्याचा विचार नाही, पण ते एकत्र राहू लागले आहेत.
घटस्फोटाबद्दल प्रियदर्शन काय म्हणाले?
अलिकडेच फिल्मफेअरशी बोलताना प्रियदर्शनने अखेर खुलासा केला की, त्यांच्या घटस्फोट होणामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, “आम्ही बत्तीस वर्षे एकत्र होतो. अखेरीस,अहंकार डोकं वर काढू लागला. माझं अस्तित्व तुझ्यामुळे आहे, किंवा तुझं अस्तित्व माझ्यामुळे आहे,अशी भावना निर्माण झाली. यामुळे आमच्या नात्यात कटुता आली. म्हणून आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.”
दिग्दर्शकाने पुढे म्हटलं,"विभक्त झाल्यानंतर आम्हाला नात्याचं महत्त्व कळलं. म्हणून आम्ही पुन्हा एकत्र आलो.याचा अर्थ असा होता की आमच्या मनात खरं प्रेम कुठेतरी दडलेलं होतं. आयुष्यात प्रत्येकाला कोणाचीतरी गरज भासते. त्यामुळे आमचं एकत्र येणं गरजेचं होतं."
दरम्यान, प्रियदर्शन यांनी १९९० मध्ये अभिनेत्री लिसी यांच्यासोबत लग्न केलं. जवळपास २४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर, प्रियदर्शनची पत्नी लिसीने २०१४ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. दोन वर्षांच्या न्यायालयीन खटल्यानंतर, २०१६ मध्ये या जोडप्याला घटस्फोट मंजूर झाला.