Bharti Singh : Video - "मला आणि हर्षला हत्ती-मुंगीची जोडी म्हटलं तर काहींनी..."; ट्रोलिंगवर भारती सिंग ढसाढसा रडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 13:15 IST2022-12-16T13:04:12+5:302022-12-16T13:15:11+5:30
Bharti Singh And Malaika Arora : मलायका आणि भारतीने या एपिसोडमध्ये ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला असून खासगी आयुष्यावरून ट्रोल करणाऱ्यांना भारतीने सडेतोड उत्तर देखील यामध्ये दिल्याचं पाहायला मिळतं आहे.

Bharti Singh : Video - "मला आणि हर्षला हत्ती-मुंगीची जोडी म्हटलं तर काहींनी..."; ट्रोलिंगवर भारती सिंग ढसाढसा रडली
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) "मूव्हिंग इन विद मलायका" या शोमुळे जोरदार चर्चेत आहे. तिच्या शोमधील काही वाक्य, भन्नाट किस्से हे समोर येत असतात. नुकतीच कॉमेडी क्वीन भारती सिंगने (Bharti Singh) तिच्या या कार्यक्रमात हजेरी लावली. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून सध्या तो जोरदार व्हायरल होत आहे. मलायका आणि भारतीने या एपिसोडमध्ये ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला असून खासगी आयुष्यावरून ट्रोल करणाऱ्यांना भारतीने सडेतोड उत्तर देखील यामध्ये दिल्याचं पाहायला मिळतं आहे.
शोमध्ये भारती भावूक झाली. तिचं आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) याचं जेव्हा लग्न झालं. तेव्हा झालेलं ट्रोलिंग आठवून ती भावूक झालेली पाहायला मिळाली. शोमध्ये भारती सिंग आणि मलायका अरोरा सोशल मीडियावर ट्रोल होण्याच्या मुद्द्यावर बोलताना दिसत आहेत. भारती म्हणते, "मला फक्त बाहेरच्या लोकांनीच नाही तर माझ्या घरच्या लोकांनीही खूप ट्रोल केलं. मला बरेचदा सांगितलं जायचं – बस झालं... मुलींनी एवढं खाऊ नये, भविष्यात काय करशील, तुझं लग्न होणार नाही… आणि हे सगळं ऐकून मला वाटायचं की माझ्या खाण्याचा आणि लग्नाचा काय संबंध?"
भारती हर्षसोबतचा लग्नाचा काळ आठवून भावूक झाली. तिला अश्रू अनावर झाले. भारती म्हणते, "जेव्हा मी हर्षसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची घोषणा केली तेव्हा मला आणि हर्षला खूप ट्रोल केलं गेलं. जेव्हा मी माझ्या रोकाचा पहिला फोटो शेअर केला तेव्हा त्यावर कमेंट्स आल्या – ही आहे हत्ती आणि मुंगीची जोडी. मला कोणी सांगितलं- हर्ष खूप बारीक आहे, तर कुणी म्हणायचं- आता तू फुटणार आहेस का?" भारती रडायला लागल्यावर मलायकाने तिला शांत केलं.
या सगळ्या गोष्टी आठवून भारती रडते आणि म्हणते - "कोणी एखाद्याला इतकं ट्रोल कसं करू शकतं? एकाने लिहिले होतं – आई आणि मुलाचं लग्न झालं…, कोणी लिहिलं – लहान मुलासोबत लग्न केलं की काय?, तर एकाने लिहिलं – बकरा आणि म्हैस एकत्र. भारतीने पुढे हर्षला कसं टार्गेट करण्यात आलं हे देखील सांगितलं. भारती म्हणते, 'मला आणि हर्षला केवळ वजनावरूनच नाही तर इतर गोष्टींवरूनही ट्रोल केलं गेलं. हर्षने केवळ पैशासाठी भारतीशी लग्न केल्याचं बोललं जात होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"