Bharti singh: 'मला शक्य असतं तर...'; 'या' व्यक्तींमुळे भारती सिंहने अद्यापही दाखवला नाही बाळाचा चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 13:43 IST2022-04-20T13:42:27+5:302022-04-20T13:43:05+5:30
Bharti singh: अलिकडेच भारतीने तिच्या बाळाचा चेहरा न दाखवण्यामागचं कारण सांगितलं आहे. तसंच बाळाला प्रसार माध्यमांसमोर कधी आणणार हेदेखील तिने सांगितलं.

Bharti singh: 'मला शक्य असतं तर...'; 'या' व्यक्तींमुळे भारती सिंहने अद्यापही दाखवला नाही बाळाचा चेहरा
आपल्या विनोदशैलीने प्रत्येक प्रेक्षकाला हसायला भाग पाडणारी कॉमेडी क्वीन म्हणजे भारती सिंह (Bharti Singh). काही दिवसांपूर्वीच भारतीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे या बाळाविषयीची अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. यात बाळाचं नाव जाणून घेण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी नेटकरी आतुर झाले आहेत. मात्र, अद्यापही भारतीने तिच्या बाळाविषयी कोणतीही माहिती उघड केली नाही. इतंकच नाही तर तिने अजूनही बाळाचा चेहरा का दाखवला नाही हे सांगितलं आहे.
अलिकडेच भारतीने तिच्या बाळाचा चेहरा न दाखवण्यामागचं कारण सांगितलं आहे. तसंच बाळाला प्रसार माध्यमांसमोर कधी आणणार हेदेखील तिने सांगितलं. भारतीने तिच्या Vlog मध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
"मला शक्य असतं तर मी बाळ जन्माला आल्या आल्या त्याचा पहिला फोटो पोस्ट केला असता. पण, तसं करणं मला शक्य नाही. कारण, बाळाच्या जन्मानंतर ४० दिवसांपर्यंत मी त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करु नये असं माझ्या आई आणि सासूबाईंनी सांगितलं आहे. त्यामुळे मोठ्यांचा मान राखत मी माझ्या बाळाचा फोटो अजून शेअर केलेला नाही", असं भारती म्हणाली.
दरम्यान, बाळाला ४० दिवस पूर्ण झाल्यानंतर ती तिच्या बाळाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. तसंच भारतीने तिच्या बाळाचं गोला असं टोपणनावदेखील ठेवलं आहे. बाळ गोलूमोलू असल्यामुळे त्याला हे नाव दिल्याचं तिने सांगितलं.