मुलाच्या डेब्यूसाठी अशी झटतेय भाग्यश्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 20:00 IST2018-07-16T17:13:57+5:302018-07-16T20:00:00+5:30
एकीकडे संपूर्ण बॉलिवूड जान्हवी कपूर व सारा अली खान यांच्या डेब्यूविषयी बोलत असताना दुसरीकडे आणखी एक स्टार किड्स धमाकेदार बॉलिवूड डेब्यू करण्याच्या तयारीत आहे.

मुलाच्या डेब्यूसाठी अशी झटतेय भाग्यश्री!
एकीकडे संपूर्ण बॉलिवूड जान्हवी कपूर व सारा अली खान यांच्या डेब्यूविषयी बोलत असताना दुसरीकडे आणखी एक स्टार किड्स धमाकेदार बॉलिवूड डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री भाग्यश्री हिचा मुलगा अभिमन्यू याच्याबद्दल. सलमान खानसोबत ‘मैनें प्यार किया’मधून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या भाग्यश्रीचा लाडका मुलगा अभिमन्यू लवकरच बॉलिवूड डेब्यू करतोय़ वसन बालन यांच्या ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटात अभिमन्यू दिसणार आहे. अॅक्शन -कॉमेडीची भरमार असलेला हा चित्रपट अनुराग कश्यपची निर्मिती आहे. खरे तर अभिमन्यूच्या या बॉलिवूड डेब्यू सिनेमाबद्दलची बातमी आम्ही फार पूर्वीच तुम्हाला दिली होती. आता हे सगळे पुन्हा एकदा सांगायचे कारण म्हणजे भाग्यश्री. होय, आपल्या मुलाचा ग्रॅण्ड डेब्यू व्हावा, अशी भाग्यश्रीची म्हणे इच्छा आहे आणि सध्या ती यासाठीस्र झटतेय. आपल्यासारखेच आपल्या मुलानेही नाव काढावे, यासाठी तिचे खास प्रयत्न सुरू आहेत. मुलाला अभिनयाच्या टीप्स देण्यासोबतचं तो सतत चर्चेत राहावा, यासाठीही तिचे खास प्रयत्न चालले असल्याचे कळतेय.
रिपोर्ट्सचे मानाल तर, यात अभिमन्यूच्या अपोझिट दिसणार आहे, ती राधिका मदन. अभिमन्यू व राधिका या दोघांनी ब-याच दिवसांपासून चित्रपटाची तयारी सुरु केल्याचे कळतेय. कारण या चित्रपटात जबरदस्त अॅॅक्शन सीन्स आहेत.
भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून केले आहे. ‘दम मारो दम’ आणि ‘नौटंकी साला’मध्ये त्याने अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. सध्या तरी तो आपल्या डेब्यू चित्रपटात व्यस्त आहे. अभिमन्यूचे मानाल तर, तो त्याच्या डेब्यूसाठी प्रचंड उत्सूक आहे. सोबतच त्याच्यावर दबावही आहे. स्टारकिड्स असल्याने काहीही फायदा होत नाही. उलट याने तुमच्यावर अधिक प्रेशर निर्माण होते, असे त्याचे मत आहे. आता हे प्रेशर अभिमन्यू कसे आणि किती पेलतो, हे लवकरच कळेल. तूर्तास तरी अभिमन्यूच्या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. लवकरच त्याच्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहेत.