सेटवर अचानक भलंमोठं झाड कोसळलं अन्...; थोडक्यात बचावले कलाकार; अभिनेत्याने सांगितला थरारक प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:33 IST2026-01-19T13:27:22+5:302026-01-19T13:33:47+5:30
"तो क्षण खूप भयानक होता...", अभिनेत्याने सांगितला चित्रपटाच्या सेटवर घडलेला थरारक प्रसंग, काय घडलेलं?

सेटवर अचानक भलंमोठं झाड कोसळलं अन्...; थोडक्यात बचावले कलाकार; अभिनेत्याने सांगितला थरारक प्रसंग
Bhabiji Ghar Par Hain Movie: टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय असणारा शो म्हणजे 'भाभीजी घर पर है'. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. छोट्या पडद्यावर धुमाकूळ घातल्यानंतर ही कथा आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.अलिकडेच'भाभीजी घर पर हैं - फन ऑन द रन' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे सिनेरसिकांमध्ये देखील चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याच चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता आसिफ शेखने शूटिंगवेळचा एक भयावह किस्सा शेअर केला.
आसिफ शेखने ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात सेटवर घडलेल्या त्या प्रसंगाविषयी खुलासा केला. रवी किशन एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. ही घटना 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेच्या नवीन ठिकाणी चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी घडली.'भाभीजी घर पर हैं - फन ऑन द रन' च्या शूटिंगवेळी एका मोठ्या अपघातातून अभिनेते रवी किशन थोडक्यात बचावले.त्या प्रसंगाविषयी बोलताना अभिनेता म्हणाला, "एका नवीन ठिकाणी आमचं शूट होतं आणि तो कामाचा पहिलाच दिवस होता. रवी किशन आणि आम्ही दोघेही एका ठिकाणी बसून चहा पीत होतो. त्यावेळी अचानक १२-१३ फूट लांबीचं एक झाड आमच्या अगदी मध्येच कोसळलं. तो क्षण खूप भयानक होता. आमच्यापैकी जर कोणी त्या झाडाखाली पडलं असतं तर आम्ही नक्कीच चिरडून मेलो असतो.
यावर प्रतिक्रिया देताना पुढे रवी किशन म्हणाले, "त्या झाडाचं वजन साधारण ५०० किलो इतकं असेल. ते झाड अगदी आमच्या पडले आणि त्यावेळी एक खूप मोठा आवाज झाला. त्या घटनेदरम्यान माझ्या खांद्यालाही थोडं खरचटलं. "
आमच्या तोंडून शब्द फुटत नव्हता...
त्यानंतर सिनेमाचे प्रोड्यूसर संजय कोहली यांनी सांगितलं, "जवळपास ३० मिनिटं आम्ही सर्वजण शांत झालो होतो; कोणाच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. त्यावेळी रवीच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि तो उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये गेला. पण अर्ध्या तासाच्या आतच तो सेटवर परत आला आणि परत शूटिंगला सुरुवात केली."
'भाबीजी घर पर हैं: फन ऑन द रन' चित्रपटामध्ये, रवी किशन आणि आसिफ शेख व्यतिरिक्त, शुभांगी अत्रे, विदिशा श्रीवास्तव, रोहिताश्व गौर आणि मुकेश तिवारी अशी तगडी स्टारकास्ट आहे.