ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्याने कहरच केला! बोट कापलं अन्...; व्हिडीओ पाहून डोक्यावर हात माराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:35 IST2025-08-14T11:30:26+5:302025-08-14T11:35:56+5:30
ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्याने केला कहर! ब्लेडने बोट कापलं अन्...; व्हिडीओ पाहून डोक्याला लावाल हात

ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्याने कहरच केला! बोट कापलं अन्...; व्हिडीओ पाहून डोक्यावर हात माराल
Jr. NTR Fan Video:बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि ज्यूनिअर एनटीआर यांची प्रमुख भूमिका असलेल्या वॉर-२ सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस आज १४ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. 'वॉर २' हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटासाठी प्रत्येक कलाकराने मेहनत घेतल्याचं दिसतंय. वॉर-२ च्या माध्यमातून ज्यूनिअर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. त्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर ज्यूनिअर एनटीआरच्या चाहत्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांंचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता ज्युनिअर एनटीआरची साऊथमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमा पाहण्यासाठी चाहते अक्षरश: झुंबड उडते. दरम्यान, 'वॉर-२' च्या प्रदर्शनच्यापूर्वी अभिनेत्याच्या चाहत्याने केलेल्या कृतीकडे सिनेरसिकांच्या नजरा वळल्या आहेत. 'viralbhayani' च्या सोशल मीडिया अकाउंटवर ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्याचा एक विचित्र व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो चाहता चक्क आपला हात कापून ज्युनियर एनटीआरच्या 'वॉर-२' मधील प्रत्येक पोस्टरला त्याच्या रक्ताने टिळा लावताना दिसत आहे. तर काही जण फटाके फोडताना दिसत आहे. स्वत चा जीवाची पर्वा न करत ब्लेडने बोट कापणारा हा जगावेगळा चाहता आहे. या क्रेझी चाहत्यांचं वर्तन पाहून काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
अलिकडेच 'वॉर-२' चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. जो प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. या ट्रेलमधील हृतिक आणि ज्यूनिअर एनटीआरची जबदस्त लूक लक्ष वेधून घेतो. वॉर-२ मध्ये ज्युनिअर एनटीआर नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात किआरा अडवणी फी-मेल लीडमध्ये दिसणार आहे.