'क्रिमिनल जस्टिस ४' फेम बरखा सिंग शाहरुख खानविरुद्ध खटला दाखल करणार? काय प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:39 IST2025-07-25T10:33:59+5:302025-07-25T10:39:10+5:30

बरखा सिंग सध्या चर्चेत आली आहे.

Barkha Singh Want To Case Filed Against Shah Rukh Khan Due To This Reason | 'क्रिमिनल जस्टिस ४' फेम बरखा सिंग शाहरुख खानविरुद्ध खटला दाखल करणार? काय प्रकरण...

'क्रिमिनल जस्टिस ४' फेम बरखा सिंग शाहरुख खानविरुद्ध खटला दाखल करणार? काय प्रकरण...

Barkha Singh on Shah Rukh Khan: बरखा सिंग ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. बरखानं आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून वयाच्या १० वर्षी केली होती. तिचा पहिला चित्रपट होता 'मुझसे दोस्ती करोगे' होता. ज्यात करिना कपूरव्यतिरिक्त अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता हृतिक रोशन यांच्या मुख्य भूमिका होत्या. याच चित्रपटात बालपणीच्या करिना कपूरची भूमिका बरखा सिंगनं साकारली होती. आता १९ वर्षांनंतर बरखा सिंग सौंदर्याच्या बाबतीत ती आघाडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते. अलिकडेच 'क्रिमिनल जस्टिस ४' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. अशातच तिनं शाहरुख खानवर भाष्य केलंय.

दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बरखानं बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानवर मजेशीर पद्धतीनं 'खटला' दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'दैनिक जागरण' या माध्यमाशी बोलताना तिला विचारण्यात आलं, "जर तुला एखाद्या कलाकाराविरोधात खटला दाखल करायचा असेल, तर तो कोणाविरुद्ध दाखल करशील?" यावर उत्तर देताना ती म्हणाली, "मी शाहरुख खानविरुद्ध खटला दाखल करेन, कारण इतक्या लोकांची मने चोरण्याचा अधिकार त्यांना नाही".यावर पुढे खुलासा करत ती म्हणाली, "या खटल्यात मी गौरी खान यांना न्यायाधीश म्हणून निवडेल, कारण मला वाटतं त्या माझ्या बाजूने निर्णय देतील". या मजेशीर उत्तरातून बरखानं शाहरुखची मोठी फॅन असल्याचं दिसलं.

बरखानं २०१३ मध्ये टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलं. तिनं 'ये है आशिकी' या मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं 'एमटीवी फना', 'लव बाय चांस', 'भाग्यलक्ष्मी', 'आहट ६', 'कैसी ये यारियां' आणि 'ब्रीद' या टीव्ही शोमध्ये दिसली. याशिवाय नुकतीच ती 'Silence Can You Hear It?' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याशिवाय तिने 'द साबरमती रिपोर्ट'मध्येही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण तिला सर्वाधिक लोकप्रियता 'क्रिमनल जस्टिस ४' मधून मिळाली आहे.

Web Title: Barkha Singh Want To Case Filed Against Shah Rukh Khan Due To This Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.