छोट्या पडद्यावरची नवी आनंदी...! लवकरच येतोय ‘बालिका वधू’चा दुसरा सीझन, पाहा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 13:08 IST2021-06-28T13:05:43+5:302021-06-28T13:08:40+5:30

Balika Vadhu 2 : ‘बालिका वधू’ ही मालिका आठवतेय? तुम्हीही या मालिकेचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, ‘बालिका वधू’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

'Balika Vadhu 2' teaser out, know all about the new cast of the upcoming series | छोट्या पडद्यावरची नवी आनंदी...! लवकरच येतोय ‘बालिका वधू’चा दुसरा सीझन, पाहा प्रोमो

छोट्या पडद्यावरची नवी आनंदी...! लवकरच येतोय ‘बालिका वधू’चा दुसरा सीझन, पाहा प्रोमो

ठळक मुद्देसध्या ‘बालिका वधू 2’चे शूटींग सुरू आहे. राजस्थानात सध्या या मालिकेचे शूटींग सुरू आहे.

‘बालिका वधू’ (Balika Vadhu) ही मालिका आठवतेय? तुम्हीही या मालिकेचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, कलर्स वाहिनीवर ‘बालिका वधू’चा दुसरा सीझन (Balika Vadhu 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पहिल्या सीझनप्रमाणेच हा दुसरा सीझनही बालविवाहाच्या कुप्रथेवर आधारित असणार आहे. याचा प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे.
आता ‘बालिका वधू’ म्हटल्यावर आनंदी असणारच.  ‘बालिका वधू 2’मध्ये एक नवी आनंदी तुम्हाआम्हाला पाहायला मिळेल. तिची एक झलक प्रोमोमध्ये दिसतेय. एक गोंडस चिमुकली रंगीबेरंगी कपड्यांमध्ये खेळताना दिसतेय. अरे कितनी सुंदर बच्ची है, इसके लिए तो नन्हा सा राजकुमार ढूंढना पडेगा..., असे तिला पाहून एक महिला म्हणते.

हे असतील आनंदी व जग्या...

‘बालिका वधू 2’मध्ये ‘आपकी नजरों ने समझा’ फेम  श्रेया पटेल छोट्या आनंदीच्या रूपात दिसणार आहे. तर  ‘बालवीर’ फेम वंश सयानी छोट्या जग्याची भूमिका साकारतोय. ‘बालिका वधू’मध्ये म्हणजे पहिल्या सीझनमध्ये आनंदीची भूमिका अविका गौरने तर जग्याची भूमिका अविनाथ मुखर्जीने साकारली होती.  मोठ्या आनंदीची भूमिका प्रत्युषा बॅनर्जी आणि मोठ्या जग्याची भूमिका शशांक व्यासने जिवंत केली होती. काही काळानंतर प्रत्युषाने मालिका सोडली होती. तिच्या जागी तोरल रसपुत्र ही आनंदीच्या भूमिकेत दिसली होती.
सध्या ‘बालिका वधू 2’चे शूटींग सुरू आहे. राजस्थानात सध्या या मालिकेचे शूटींग सुरू आहे. हा नवा सीझन पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नव्या सीझनमध्ये रिद्धी नायक शुक्ला, केतकी दवे, सीमा मिश्रा, अंशुल त्रिवेदी, सुप्रिया शुक्ला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सूत्रांचे मानाल तर येत्या आॅगस्टमध्ये हा शो प्रसारित होतोय.

Web Title: 'Balika Vadhu 2' teaser out, know all about the new cast of the upcoming series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.