'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 18:41 IST2020-12-18T18:40:48+5:302020-12-18T18:41:56+5:30

रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट बाजीराव मस्तानीला रिलीज होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

'Bajirao Mastani' turns 5 years old, Deepika Padukone shares unseen photos of the shoot | 'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो

'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो

अभिनेता रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट बाजीराव मस्तानीला रिलीज होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. संजय लीला भन्साळीच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट १८ डिसेंबर, २०१५ ला रिलीज झाला होता. चित्रपटाला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दीपिकाने आठवणींना उजाळा दिला आहे. तिने या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


दीपिका पादुकोणने फोटो शेअर केले आहेत त्यात ती मस्तानी लूकमध्ये दिसते आहे. तिच्यासोबत दिग्दर्शक संजय लीला भन्साळीदेखील पहायला मिळत आहेत. फोटो शेअर करत दीपिकाने लिहिले की, "प्रेम असो वा लढाई, मस्तानी तिच्या आवडीने सज्ज होती, स्वत: चे नशिब लिहिण्यास, न घाबरता, कितीही धोकादायक मार्ग असला तरी. ती कधीही नतमस्तक झाली नाही आणि नेहमीच तिच्या प्रेमाने तिने तिचा आधार भक्कम केला की जळत्या निखारे पार करत तिने तिचे प्रेम आणि तिच्या प्रियकराचे नाव स्वतःशी जोडून घेतले. कायमस्वरूपी."  काही तासातच या फोटोला ११ लाखांहून जास्त पसंती मिळाली. तिचा हा फोटो खूप व्हायरल होतो आहे.


दीपिका पादुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दीपिका सध्या सिद्धांत चतुर्वेदीसोबत अनटाइटल्ड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ती नेहमी गेटवे ऑफ इंडियावरून बोटमधून सिद्धांतसोबत शूटिंग लोकेशनपर्यंत प्रवास करताना दिसते. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असते. कित्येकदा दीपिका रणवीर सिंगला ड्रॉप करतो.


दीपिका पादुकोणच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचं तर ती लवकरच ८३ चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: 'Bajirao Mastani' turns 5 years old, Deepika Padukone shares unseen photos of the shoot