बेबी डॉल सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 13:18 IST2018-07-06T13:15:23+5:302018-07-06T13:18:59+5:30

सनी लिओनीचा बायोपिक ‘करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी आॅफ सनी लिओनी’चा ट्रेलर आज आऊट झाला आहे

Babydoll Sunny Leone's biopic trailer out | बेबी डॉल सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर आऊट !

बेबी डॉल सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर आऊट !

ठळक मुद्देसनी रिऑलिटी शो 'बिग बॉस 5'मध्ये सहभागी झाली होती.सनी लिओनी भारतात सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींपैकी एक आहे.

सनी लिओनीचा बायोपिक ‘करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी आॅफ सनी लिओनी’चा ट्रेलर आज आऊट झाला आहे. सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तिची ओळख पॉर्न स्टार म्हणून होती. ट्रेलरमध्ये सनीचा करणजीत कौरपासून ते सनी लिओनीपर्यंच्या प्रवासाची झलक दिसतेय. करणजीतचे बालपण कसे होते, तिच्या कुटुंबीयांवर तिने घेतलेल्या निर्णयाचा काय परिणाम झाला असा सगळा प्रवास तिच्या या बायोपिकमध्ये दिसणार.   पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री हा प्रवास सनीसाठी सोपा नव्हता. बॉलिवूडमध्ये येण्याआधी पॉर्न स्टार ही तिची ओळख बनली होती. ही ओळख पुसण्याचे सनीने बरेच प्रयत्न केलेत. सनीचे खरे नाव करणजीत कौर. 

सनी रिऑलिटी शो 'बिग बॉस 5'मध्ये सहभागी झाली होती. याशोनंतर तिच्या बॉलिवूड प्रवासाची दारं उघडी झाली. याच घरात महेश भट्ट यांनी सनीला ‘जिस्म2’ची आॅफर दिली होती. पुढे तिला एकता कपूरचा ‘रागिनी एमएमएस2’ही मिळाला. यानंतर शाहरूख खानसोबत स्क्रिन शेअर करण्यापासून अनेक बिग बॅनरच्या चित्रपटात आयटम साँग करताना ती दिसली.   

सनी लिओनी भारतात सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींपैकी एक आहे. सनी वीरमादेवी या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. या सिनेमात ती वीरमादेवीची मुख्य भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. वीरमादेवी एक यौद्धा राजकुमारी असणार आहे.  वीरमादेवीचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले. आपल्या भूमिकेसाठी सनी सध्या तलवारबाजी आणि घोडस्वारी शिकताना दिसत आहे.  आता हे पाहणे औत्सुकायचे ठरणार आहे की प्रेक्षक सनीच्या बायोपिकला कसा रिपॉन्स देतात.  

Web Title: Babydoll Sunny Leone's biopic trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.