आयुषमान खुरानाचा 'थामा' १०० कोटींच्या क्लबमध्ये, बजेटच्या आकड्यांपासून इतका दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:14 IST2025-10-29T16:13:44+5:302025-10-29T16:14:27+5:30
'थामा'ला मिळालेलं यश पाहून आयुषमान खुरानाने आनंद व्यक्त केला आहे.

आयुषमान खुरानाचा 'थामा' १०० कोटींच्या क्लबमध्ये, बजेटच्या आकड्यांपासून इतका दूर
बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जाणारा आयुषमान खुराना सध्या चर्चेत आहे. अलिकडेच त्याचा 'थामा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होताच इतिहास रचला आहे. या सिनेमाला प्रेक्षक तसंच समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळालाय. पहिल्या दिवसापासूनच सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पकड कायम ठेवली आहे. 'थामा' १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे.
थामाला मिळालेल्या यशाबद्दल आयुषमान खुराना याने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, "व्यावसायिक यश हे प्रत्येक अभिनेत्यासाठी मोठं समाधान असतं. माझ्या सिनेमा शैलीसोबत असं यश मिळणं माझ्यासाठी खास आहे,.कारण मला नेहमीच नवं, वेगळं आणि प्रामाणिक कंटेंट आवडतं. असा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचतोय, हे पाहणे एका कलाकारासाठी अत्यंत आनंददायी आहे".
आयुषमानने पुढे कृतज्ञता व्यक्त केली, "माझ्या इतक्या चित्रपटांनी फ्रँचायझ बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांनी माझ्या सिनेमांना दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे". दरम्यान, अभिनेत्याच्या 'ड्रीम गर्ल', 'बधाई हो', 'शुभ मंगल सावधान', 'थामा' आणि 'अंधाधुन' यांसारख्या चित्रपटांमुळे त्याने भारतीय सिनेमाला एक नवीन दिशा दिली आहे. ज्यांच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहचलेला थामा हा अभिनेत्याचा पाचवा चित्रपट आहे.
आयुषमानचे १०० कोटी हिट चित्रपट:
थामा - १०३.५० कोटी
ड्रीम गर्ल - १४२.२६ कोटी
बधाई हो - १३७.६१ कोटी
बाला - ११६.८१ कोटी
ड्रीम गर्ल २ -१०४.९०