आपल्या होमटाऊनमध्ये शूटिंग करत असलेल्या आयुष्मान खुराणाने घेतला हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 15:04 IST2020-11-04T14:59:09+5:302020-11-04T15:04:12+5:30
या चित्रपटात आयुष्यमानसोबत वाणी कपूरसुद्धा आहेत

आपल्या होमटाऊनमध्ये शूटिंग करत असलेल्या आयुष्मान खुराणाने घेतला हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा सध्या त्याच्या शहरात म्हणजेच चंदीगडमध्ये आपल्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मात्र, तो घरात राहण्याऐवजी तो हॉटेलमध्येच राहतोय.
आयुष्मानच्या या चित्रपटाचे नाव 'चंदीगड करे आशिकी आहे', याचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करतो आहे. या चित्रपटात वाणी कपूरसुद्धा आहेत. सध्या सुरू असलेल्या कोविड -१९ महामारीमुळे आयुष्यमान आपल्या घरी न थांबण्याचे निर्णय घेतला आहे.
तो म्हणाला आहे की, मी वेळीच खूप सावधगिरी बाळगतो आहे आणि मी माझ्या कुटुंबाचे व्हायरसपासून बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. माझ्यामुळे, माझी पत्नी आणि मुलांना अडचणी येऊ नयेत. माझे पालक चंदीगडमध्ये आहेत, त्यांच्या सुरक्षेची देखील काळजी आहे. मला कुटुंबाला व्हायरसपासून वाचवायचे आहे. अभिनेता आपल्या चित्रपटाच्या संपूर्ण प्रोडक्शन टीमसमवेत हॉटेलमध्ये थांबला आहे.
आयुष्मान खुराणा त्याच्या नव्या सिनेमात एका खेळाडूची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यासाठी त्याने कठोर ट्रेनिंग घेतलं आहे. अभिषेक कपूर सिनेमात वाणी कपूरला कास्ट केल्याचं सांगत म्हणाला की, 'वाणी एक कमिटेड अभिनेत्री आहे. तसेच मी आयुष्मान खुराणा आणि वाणी कपूरसोबत पहिल्यांदाच काम करण्यासाठी उत्साहीत आहे. ही जोडी सुद्धा पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे'.