Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:10 IST2025-06-25T14:09:40+5:302025-06-25T14:10:00+5:30

राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी भारतीय अंतराळवीर अंतराळात जात आहे. पण, अंतराळातून झेप घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी हृतिक रोशनच्या सिनेमातील गाणं ऐकलं.

axiom 4 space mission shubhanshu shukla listen hrithik roshan fighter movie song before going to space | Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?

नासाची NASA Ax-4 Mission या अंतराळ मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे.  भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचादेखील या मोहिमेत सहभाग असून हा भारतीयांसाठी ऐतिहासिक क्षण आहे. राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी भारतीय अंतराळवीर अंतराळात जात आहे.  पण, अंतराळातून झेप घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी हृतिक रोशनच्या सिनेमातील गाणं ऐकलं. 

शुभांशू शुक्ला यांनी हृतिक रोशनच्या 'फायटर' या सिनेमातील गाणं अवकाश भरारी घेण्यापूर्वी ऐकल्याची माहिती एका क्रू मेंबरने दिली आहे. 'फायटर' सिनेमातील 'वंदे मातरम' हे गाणं त्यांनी ऐकलं. फ्लोरिडा येथून त्यांनी फाल्कन-९ या अंतराळ यानाने उड्डाण घेतलं. अंतराळ यानात जाण्यापूर्वी त्यांनी त्यांचं आवडतं 'वंदे मातरम' हे गाणं ऐकलं. 

काय आहे कनेक्शन? 

अंतराळवीर जेव्हा मोहिमेवर जातात. तेव्हा त्यापूर्वी ते कुटुंबीयांना भेटून त्यांचा निरोप घेतात. त्यानंतर आपलं आवडतं गाणं ते ऐकतात, ही नासाची परंपरा आहे. अंतराळवीरांना रिलॅक्स करण्यासाठी आणि त्यांचं मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही परंपरा असल्याचं म्हटलं गेलं आहे. 

नासाच्या या मोहिमेत शुभांशू शुक्ला भारताचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. त्यांच्यासोबत आणखी तीन अंतराळवीर या मोहिमेवर आहेत. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी ३ एप्रिल १९८४ साली स्पेस मिशन सोवियत संघाच्या मदतीने केले होते. त्यानंतर शुभांशू शुक्ला हे दुसरे भारतीय अंतराळात जात आहे. १ वर्षाच्या कठोर मेहनतीनंतर स्पेस मिशनसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. याआधी हे मिशन सात वेळा टळले आहे. बऱ्याचदा समोर आलेल्या तांत्रिक बिघाडानंतर अखेर ISS चे ज्वेज्दा मॉड्यूल उड्डाणासाठी तयार करण्यात आले. अनेक वर्ष अंतराळ संस्था यावर काम करत होती. नासाच्या कॅनडी स्पेस सेंटरवरून फाल्कन ९ ने यशस्वी अवकाशाकडे उड्डाण घेतले आहे.

Web Title: axiom 4 space mission shubhanshu shukla listen hrithik roshan fighter movie song before going to space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.