गोबऱ्या गालांची ‘ही’ गोलूमोलू चिमुकली लवकरच करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री, तुम्ही ओळखलंत ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 17:42 IST2022-04-08T17:39:29+5:302022-04-08T17:42:56+5:30
Throwback : होय, या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तिचा बालपणीचा हा गोलूमोलू फोटो पाहून सगळेच तिच्या प्रेमात पडले आहेत.

गोबऱ्या गालांची ‘ही’ गोलूमोलू चिमुकली लवकरच करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री, तुम्ही ओळखलंत ?
एकेकाळी बॉलिवूडच्या स्टार्सची चलती होती. इतकी की छोट्या पडद्यावरच्या कलाकारांना फारसं कुणी विचारत देखील नव्हतं. पण सोशल मीडिया आला आणि अख्खं चित्र पालटलं. आता बॉलिवूड व टीव्ही स्टार्सची ब्रँड व्हॅल्यू समान झाली आहे. बॉलिवूड स्टार्स इतकीच छोट्या पडद्यावरच्या कलाकारांचीही क्रेझ पाहायला मिळतेय. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीनं हवा केली आहे. होय, या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तिचा बालपणीचा हा गोलूमोलू फोटो पाहून सगळेच तिच्या प्रेमात पडले आहेत. फोटोतील ही गोबऱ्या गालांची चिमुकली आज टीव्हीची स्टार आहे. एकेकाळी टिकटॉकवर तिचं राज्य चालायचं. लवकरच ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत (Nawazuddin Siddiqui) मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
ही छोकरी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि अजूनही तुम्ही तिला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. ही दुसरी तिसरी कुणी नसून अवनीत कौर (Avneet Kaur) आहे.
लवकरच अवनीत कौर नवाजसोबत ‘टीकू वेड्स शेरू’ या चित्रपटात दिसणार आहे. अवनीत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवे फोटो ती शेअर करत असते. चाहते अवनीतच्या सौंदर्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे अवनीतचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालतात.
अवनीतने डान्स इंडिया डान्स- लिटील मास्टर या शोमधून करिअरला सुरूवात केली होती. सेमिफायनलआधीच ती या शोमधून बाद झाली होती.
यानंतर डान्स के सुपरस्टार्स या रिअॅलिटी शोमध्येही तिने भाग घेतला. पुढे ती अॅक्टिंगमध्ये आली. मेरी मां, टेढे है पर मेरे है, सावित्री, एक मुठ्ठी आसमान या मालिकेत तिने काम केले. अलादीन- नाम तो सुना होगा या मालिकेत तिने यासमीनची भूमिका साकारत होती. टीव्ही व्यतिरिक्त बॉलिवूडच्या करीब करीब सिंगल, मर्दानी चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातही ती झळकली होती.