अतिफ अस्लमने दाखवली लेकीची पहिली झलक; क्यूटनेसमुळे हलिमा जिंकतीये नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 12:43 PM2024-03-24T12:43:42+5:302024-03-24T12:44:24+5:30

Atif aslam: हलिमा ही आतिफची धाकटी लेक असून तिची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक होते.

atif-aslam-reveled-daughter-haleema-face-for-the-first-time-on-her-birthday | अतिफ अस्लमने दाखवली लेकीची पहिली झलक; क्यूटनेसमुळे हलिमा जिंकतीये नेटकऱ्यांची मनं

अतिफ अस्लमने दाखवली लेकीची पहिली झलक; क्यूटनेसमुळे हलिमा जिंकतीये नेटकऱ्यांची मनं

'दिल दिया गल्ला',  'तेरे संग यारा', 'तू जाने ना', 'तेरा होने लगा हूँ' अशी कितीतरी सुपरहिट गाणी देणारा गायक म्हणजे आतिफ अस्लम. सोशल मीडियावर आतिफ अस्लमचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. गेल्या वर्षी आतिफ एका गोड चिमुकलीचा बाबा झाला. त्यामुळे त्याच्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक होते. अखेर वर्षभरानंतर आतिफने त्याच्या लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.

कलाविश्वात सक्रीय असलेल्या आतिफच्या पत्नीने साराने २३ मार्च २०२३ ला एका गोड चिमुकलीला जन्म दिला. नुकताच आतिफने त्याच्या लेकीचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. आतिफच्या लेकीचं नाव हलिमा असं असून ती प्रचंड क्यूट असल्याचं फोटोवरुन लक्षात येतं.

आतिफ अस्लमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हलिमाचा फोटो शेअर करत, , “बाबाने राजकन्येचे शूज खिशात ठेवले आहेत, जेव्हा माझ्या हलिमाला तो हवा असेल तेव्हा ती सांगेल. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा,” असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, आतिफ अस्लमने २०१३ मध्ये साराशी निकाह केला. लाहोरमध्ये त्यांचा निकाह पार पडला. आतिफ आणि साराला अब्दुल व अर्यान ही दोन मुलं असून हलिमा ही त्याची तिसरी लेक आहे.

Web Title: atif-aslam-reveled-daughter-haleema-face-for-the-first-time-on-her-birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.