अथिया शेट्टी अन् केएल राहुलनं मुंबईतील पाली हिल परिसरात खरेदी केलं आलिशान घर, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 11:03 IST2024-07-18T10:57:24+5:302024-07-18T11:03:34+5:30

मुंबईतील पाली हिल परिसरात अथिया शेट्टी आणि केएल राहुलने आलिशान घर खरेदी केलं आहे.

Athiya Shetty Kl Rahul Buy Luxurious Apartment Worth Rs 20 Crores In Mumbai Pali Hill Area | अथिया शेट्टी अन् केएल राहुलनं मुंबईतील पाली हिल परिसरात खरेदी केलं आलिशान घर, जाणून घ्या किंमत

अथिया शेट्टी अन् केएल राहुलनं मुंबईतील पाली हिल परिसरात खरेदी केलं आलिशान घर, जाणून घ्या किंमत

बाॅलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी ही कायमच चर्चेत असते. अथिया शेट्टी ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायम खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अथिया शेट्टी हिने क्रिकेटर केएल राहुल याच्यासोबत लग्न केलं. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी 2023 मध्ये लग्न केले. नुकतंच आथिया आणि राहुल यांनी मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. 

मुंबईतील पाली हिल परिसरातील संधू पॅलेस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक आलिशान अपार्टमेंट अथिया आणि राहुलने विकत घेतलं आहे. हे अपार्टमेंट 3,350 स्क्वेअर फूट आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी या अपार्टमेंटसाठी 1.20 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. या अपार्टमेंटची किंमत 20 कोटी रुपये असून 15 जुलै रोजी मालमत्तेची नोंदणी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पाली हिल परिसर हा मुंबईचा अतिशय पॉश परिसर आहे आणि अनेक बॉलिवूड स्टार्स येथे राहतात. आमिर खानही याच भागात राहतो.  म्हणजेच आता अथिया शेट्टी आणि केएल राहुल अभिनेता आमिर खानचे शेजारी बनले आहेत.  रियल्टी प्लॅटफॉर्म IndexTap.com द्वारे मिळवलेल्या कागदपत्रांच्या आधारे 'नवभारत टाईम्सन'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

अथिया आणि केएल राहुल यांच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झाल्यास दोघांची संपत्ती 130 कोटी रुपये आहे. त्यांचे मुंबईत आलिशान घर आहे. याशिवाय, बंगळुरुमध्ये त्यांचे स्वत:चे आलिशान घर आहे. बंगळुरूतील त्यांच्या घराची किंमत सुमारे 65 लाख रुपये आहे. यासोबतच आथिया आणि राहुल यांच्याकडे लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. ज्यात लॅम्बोर्गिनी हुरॅकन स्पायडर आणि ॲस्टन मार्टिन डीबी 11, मर्सिडीज बेंझ एस क्लास यांचा समावेश आहे. 
 

Web Title: Athiya Shetty Kl Rahul Buy Luxurious Apartment Worth Rs 20 Crores In Mumbai Pali Hill Area