ASK SRK : तू तर काश्मीरी, मग 'खान' आडनाव का लावतो ?; चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिला खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 18:04 IST2023-01-04T18:01:31+5:302023-01-04T18:04:21+5:30

शाहरुख खानला (Shahrukh Khan) ट्विटरवर येऊन १३ वर्ष पूर्ण झाले. शाहरुख ट्विटरवर  #AskSRK हे सेशन घेत असतो. यात तो चाहत्यांना रिप्लाय करत असतो.

ASK SRK : You are a Kashmiri, then why do you use the surname Khan; Shahrukh gave a piece of advice on a fan's question | ASK SRK : तू तर काश्मीरी, मग 'खान' आडनाव का लावतो ?; चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिला खास सल्ला

ASK SRK : तू तर काश्मीरी, मग 'खान' आडनाव का लावतो ?; चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिला खास सल्ला

ASK SRK : शाहरुख खानला (Shahrukh Khan) ट्विटरवर येऊन १३ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त शाहरुखने त्याच्या चाहत्यांचे त्याच्या फॅन्स क्लबचे आभार मानले आहेत. दरम्यान नेहमीप्रमाणे शाहरुख खानने ask srk या सेशनमधून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

शाहरुख ट्विटरवर  #AskSRK हे सेशन घेत असतो. यात तो चाहत्यांना रिप्लाय करत असतो. त्यामुळे चाहतेही अनेक भन्नाट प्रश्न विचारतात आणि शाहरुख त्यांना जशास तसे उत्तर देतो. तर आजच्या Ask Srk मध्ये एकाने शाहरुखला विचारले, 'तुम्ही तर काश्मीरी आहात ना मग नावापुढे खान का लावता ?' यावर शाहरुखने उत्तर दिले, ' हे जग म्हणजे माझं कुटुंबच आहे. फॅमिलीच्या नावामुळे नाही तर तुम्ही तुमच्या कामामुळे मोठे होता. अशा संकूचित विचारांमध्ये अडकू नको' असा सल्ला शाहरुखने चाहत्याला दिला. 

ASK SRK : शाहरुख, 'अब रिटायर हो जाओ'; युझरच्या कमेंटवर शाहरुख खान म्हणतो, बेटा...

पठाण' हा सिनेमा २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. मात्र रिलीजआधीच पिक्चर बॉयकॉट करण्याची मागणी होऊ लागली आहे. पठाण हे नाव, बेशरम रंग गाण्यातली भगवी बिकीनी यामुळे पठाण रिलीजच होऊ देणार नाही अशी धमकीच अनेक संघटनांनी दिली आहे. आता मात्र १० जानेवारी रोजी 'पठाण'चा ट्रेलर रिलीज होतोय.  

Web Title: ASK SRK : You are a Kashmiri, then why do you use the surname Khan; Shahrukh gave a piece of advice on a fan's question