Ashutosh Rana Birthday Special : अशी झाली होती आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 18:31 IST2018-11-10T16:32:35+5:302018-11-12T18:31:55+5:30

रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. आज त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाली असून त्यांना दोन मुले देखील आहेत.

Ashutosh Rana Birthday Special: ashutosh rana and renuka shahane love story | Ashutosh Rana Birthday Special : अशी झाली होती आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांची भेट

Ashutosh Rana Birthday Special : अशी झाली होती आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांची भेट

ठळक मुद्देपहिले लग्न तुटल्यानंतर काहीच वर्षांत रेणुकाच्या आयुष्यात आशुतोष आला.राजेश्वरी आणि रेणुका या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. राजेश्वरीने रेणुका आणि आशुतोष यांची ओळख करून दिली होती. आशुतोषने दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने रेणुकाला फोन केला. त्यानंतर त्यांच्यात वारंवार फोनवर बोलणे व्हायला लागले, त्यांचे भेटणे सुरू झाले आणि त्यानंतर काहीच महिन्यात त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आशुतोष राणाचा आज म्हणजेच १० नोव्हेंबरला वाढदिवस असून त्याचा जन्म १९६७ मध्ये मध्यप्रदेश मध्ये झाला. त्याने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्याने जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. आज त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाली असून त्यांना दोन मुले देखील आहेत. खूपच कमी जणांना माहिती आहे की, आशुतोष सोबत लग्न होण्याआधी रेणुकाचे लग्न झालेले होते. रेणुकाने प्रेमविवाह केला होता. पण काहीच महिन्यात त्या दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. पहिले लग्न तुटल्यानंतर काहीच वर्षांत रेणुकाच्या आयुष्यात आशुतोष आला. हंसल मेहता यांच्या एका चित्रपटाच्या ट्रायलच्यावेळी आशुतोष अभिनेत्री राजेश्वरी सचदेवसोबत आला होता. राजेश्वरी आणि रेणुका या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. याच वेळी राजेश्वरीने रेणुका आणि आशुतोष यांची ओळख करून दिली. पण त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या संपर्कात देखील नव्हते. पण काहीच महिन्यांनी आशुतोषने दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने रेणुकाला फोन केला. त्यानंतर त्यांच्यात वारंवार फोनवर बोलणे व्हायला लागले, त्यांचे भेटणे सुरू झाले आणि त्यानंतर काहीच महिन्यात त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाची देखील एक गंमतीदार आठवण आहे. आशुतोष हा मुळचा मध्यप्रदेशचा आहे. मध्यप्रदेश मधील त्याच्या गावात त्यांचे लग्न झाले. रेणुका लग्नासाठी ट्रेनने गेली होती. त्यावेळी स्टेशनवर घ्यायला तिला कमीत कमी दीड हजार लोक तिथे आले होते. त्यांच्या लग्नाला तर इतकी गर्दी होती की, या गर्दीमुळे रेणुकाचे आई वडील लग्नाच्या ठिकाणापर्यंत देखील पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी तिचे कन्यादान तिच्या नणंदेने केले. 

Web Title: Ashutosh Rana Birthday Special: ashutosh rana and renuka shahane love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.