"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 10:38 IST2025-12-20T10:37:59+5:302025-12-20T10:38:27+5:30
अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानचं भाषण, वडिलांसारखाच आहे लेकाचाही ह्युमर

"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने करिअरमध्ये वेगली वाट धरली. वडिलांप्रमाणे त्याने फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला पण त्याने अभिनय नाही तर दिग्दर्शनाचा मार्ग निवडला. आर्यनला दिग्दर्शनाची प्रचंड आवड आहे. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'ही त्याची पहिलीच सीरिज जी यावर्षी रिलीज झाली होती. या सीरिजला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. कित्येक महिने सोशल मीडियावर या सीरिजचीच चर्चा होती. अनेक मीम्सही व्हायरल होत होते. सीरिजची कथा, म्युझिक, आर्यनचं व्हिजन सगळ्याचंच कौतुक झालं. दरम्यान आर्यनला सीरिजसाठी नुकताच पहिला पुरस्कार मिळाला.
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'सीरिजसाठीआर्यन खानला सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्याने आई गौरी खानला समर्पित केला. पुरस्कार मिळाल्यानंतर आर्यन म्हणाला, "मी सीरिजच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो ज्यांना नवख्या दिग्दर्शकावर विश्वास दाखवला. सर्वांनी खूप प्रेमाने, उत्साहाने काम केलं. हा माझा पहिला पुरस्कार आहे आणि मला आशा आहे की मला असे आणखी पुरस्कार मिळतील कारण माझ्या वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात. पण हा पुरस्कार वडिलांसाठी नाही तर माझ्या आईसाठी आहे. ती मला नेहमी सांगते की लवकर झोपायचं, लोकांची खिल्ली उडवायची नाही आणि शिव्या तर अजिबातच द्यायच्या नाहीत...आणि आज त्या सगळ्या गोष्टींसाठी मला पुरस्कार मिळाला आहे. माझ्या आईला इतका आनंद देण्यासाठी आभार आणि मला माहित आहे की आज घरी जाऊन मला जरा कमी ओरडा बसेल."
आर्यन खानच्या या भाषणावर जोरजोरात टाळ्या वाजल्या. शाहरुखप्रमाणेच आर्यनचाही कमालीचा ह्युमर आहे. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'सीरिजच्या दुसऱ्या पार्टची आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पहिल्या पार्टमध्ये अनेक दिग्गजांनी कॅमिओ केले होते. राघव जुयाल, लक्ष्य लालवानी, सेहर लांबा, आन्या सिंह यांची मुख्य भूमिका होती. तर शाहरुख, सलमान, आमिर, इम्रान हाश्मी, करण जोहर, एस एस राजामौली, रणबीर कपूर अशा अनेक कलाकारांची काही मिनिटांसाठी झलक दिसली. आता दुसऱ्या पार्टमध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.