Aryan Khan Video : 'अरे भाऊ कसला एवढा अ‍ॅटिट्यूड ?' शाहरुखचा लाडका सोशल मीडियावर होतोय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 10:09 IST2023-02-20T10:08:11+5:302023-02-20T10:09:18+5:30

किंग खानचा मुलगा म्हटल्यावर तो जिथे जाईल तिथे कॅमेरे त्याचा पाठलाग करताना दिसतात.

aryan khan shahrukh khan son getting trolled on social media over his attitude | Aryan Khan Video : 'अरे भाऊ कसला एवढा अ‍ॅटिट्यूड ?' शाहरुखचा लाडका सोशल मीडियावर होतोय ट्रोल

Aryan Khan Video : 'अरे भाऊ कसला एवढा अ‍ॅटिट्यूड ?' शाहरुखचा लाडका सोशल मीडियावर होतोय ट्रोल

Aryan Khan : बॉलिवूडचा 'पठाण' शाहरुख खानचा (Shahrukh Khan) लाडका आर्यन खान ड्रग्स केसमुळे चर्चेत आला होता. एनसीबीच्या जाळ्यात अडकल्याने त्याचं आयुष्यच बदलून गेलं. मात्र या सर्व प्रकरणात शाहरुखने कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काही महिन्यांनंतर आर्यनची सुटका झाली. आता आर्यन कुठेही दिसला तरी फोटोग्राफर्स त्याच्यामागे असतात. मात्र आर्यनचा अॅटिट्युड बघून नेटकरी त्याला सोशल मीडियावर तुफान ट्रोल करत आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आर्यनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. रेंज रोव्हर गाडीतून आर्यन एका ठिकाणी आला आहे. ड्रायव्हर सीटवर बसलेला आर्यन खान भलताच अॅटिट्यूडमध्ये दिसत आहे. कॅमेऱ्याकडे न बघता, चेहऱ्यावर थोडेही हास्य न दाखवता तो जाताना दिसतोय.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतापलेल्याच कमेंट केल्या आहेत. 'याला कोणत्या गोष्टीचा एवढा अॅटिट्यूड आहे, करत तर काहीच नाही' अशी कमेंट एकाने केली आहे. ' याला एवढा अॅटिट्यूड आहे का त्याच्या मागे लागता ' असं म्हणत अनेकांनी फोटोग्राफर्सलाही सुनावलं आहे. 

आर्यन खान सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. बॉलिवूडमध्ये अद्यापही त्याची एन्ट्री झालेली नाही. पण किंग खानचा मुलगा म्हटल्यावर तो जिथे जाईल तिथे कॅमेरे त्याचा पाठलाग करताना दिसतात. आर्यनच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी त्याचे आणि शाहरुख खानचे चाहते प्रचंड उत्सुक असतात. मात्र आर्यन अनेकदा फोटोग्राफर्सकडे दुर्लक्ष करतो, त्यांना पोझ देणं टाळतो. याआधीही अशाच कारणानं तो ट्रोल झाला होता.

Web Title: aryan khan shahrukh khan son getting trolled on social media over his attitude