अर्जुन रामपालच्या लेकीचा रॅम्पवर जलवा, Video पोस्ट करत म्हणाला, "माझी चिमुकली...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 09:44 IST2023-07-28T09:43:09+5:302023-07-28T09:44:09+5:30

फॅशन वीकमधील मुलीचे व्हिडिओ, फोटो अर्जुनने शेअर केले आहेत.

arjun rampal s daughter myra rampal walks on ramp proud daddy posts on social media | अर्जुन रामपालच्या लेकीचा रॅम्पवर जलवा, Video पोस्ट करत म्हणाला, "माझी चिमुकली...'

अर्जुन रामपालच्या लेकीचा रॅम्पवर जलवा, Video पोस्ट करत म्हणाला, "माझी चिमुकली...'

बॉलिवूडचा मोस्ट चार्मिंग अभिनेता अर्जुन रामपालने (Arjun Rampal) नुकताच त्याच्या लेकीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अर्जुनची मुलगी मायरा रामपालने (Myra Rampal) मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं असून तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मायराने इंडिया काऊचर वीकमध्ये रॅम्प वॉक केला. या फॅशन वीकमधील तिचे व्हिडिओ, फोटो अर्जुनने शेअर केले आहेत. तसंच मुलीचा अभिमान वाटत असल्याचं त्याने म्हटलं आहे.

अर्जुनने इन्स्टाग्रामवर मायराचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'मला माझ्या चिमुकलीचा खूप खूप अभिमान वाटतोय. जी सध्या रनवे काऊचरवीकमध्ये रॅम्पवर आपला जलवा दाखवत आहे.' व्हिडिओत मायराने पांझऱ्या रंगाचा लाँग ड्रेस परिधान केला आहे. अतिशय आत्मविश्वासाने ती रॅम्पवर चालताना दिसतेय. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मायराचं कौतुक केलं आहे.

मायरा अर्जुनची पहिली पत्नी मेहेरची मुलगी आहे. त्यांना मायरा आणि माहिका या दोन मुली आहेत. अर्जुनने 1998 साली मेहेर जेसियासह लग्न केले होते. लग्नाच्या २१ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. तर आता अर्जुन गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत लिव्ह इनमध्ये राहतो. गॅब्रिएलापासून अर्जुनला दोन मुलं आहेत. नुकताच तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे.

Web Title: arjun rampal s daughter myra rampal walks on ramp proud daddy posts on social media