कंगना रणौतसाठी मुलगा शोधत आहे अर्जुन रामपाल, म्हणाला - मला माहीत आहे तिला कोण आवडेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 10:37 IST2022-05-12T10:34:24+5:302022-05-12T10:37:33+5:30

Kangana Ranaut : आरजे सिद्धार्थ कननसोबत कंगना रणौत म्हणाली की, सोसायटीच अशी आहे की, अर्जुनच्या वक्तव्यांवर लक्ष देत नाही. अर्जुनही बराच कॉन्ट्रोवर्शिअल स्टेटमेंट देतो.

Arjun Rampal looking for boys for Kangana Ranaut creates matrimonial bio | कंगना रणौतसाठी मुलगा शोधत आहे अर्जुन रामपाल, म्हणाला - मला माहीत आहे तिला कोण आवडेल...

कंगना रणौतसाठी मुलगा शोधत आहे अर्जुन रामपाल, म्हणाला - मला माहीत आहे तिला कोण आवडेल...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. नुकताच तिच्या 'धाकड'चा ट्रेलर रिलीज झाला. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तिचा धाकड अंदाज स्पष्टपणे दिसत आहे. मशीन गन ते धमाकेदार अॅक्शन यात बघायला मिळाले. एका मुलाखतीत कंगना रणौत म्हणाली की, तिचा को-स्टार अर्जुन रामपाल तेवढाच कॉन्ट्रोवर्शिअल आहे जेवढी ती आहे. असं असलं तरी अर्जुन चर्चेत राहत नाह. पण तोही कॉन्ट्रोवर्शिअल स्टेटमेंट देतोच.

आरजे सिद्धार्थ कननसोबत कंगना रणौत म्हणाली की, सोसायटीच अशी आहे की, अर्जुनच्या वक्तव्यांवर लक्ष देत नाही. अर्जुनही बराच कॉन्ट्रोवर्शिअल स्टेटमेंट देतो. कंगनाने खुलासा केला की, अर्जुन रामपालने लीडिंगग फिल्ममेकरला नोज ट्रिमर दिलं होतं. कारण त्याला त्याचे नाकातील केस बघून फारच विचित्र वाटत होतं. कंगना म्हणाली की, अर्जुन कधीही काहीही करू शकतो.

कंगनाने सांगितलं की, अर्जुन बराच धाकड आणि कॉन्ट्रोवर्शिअल आहे.  त्याला जे बोलायचं असतं ते तो बोलतो. त्याला जे करायचं असतं ते तो करतो. पण त्याच्याबाबत कुणी काही वाईट छापत नाही. यावर अर्जुनने रिप्लाय दिला की, मी प्रेमाने बोलतो. कंगना थोडी धाकड स्टाइलमध्ये बोलते. अर्जुन रामपाल कंगनासाठी आजकाल एक चांगला मुलगा शोधत आहे. 

अर्जुन म्हणाला की, कंगना फार चांगली अभिनेत्री आहे. देवाला घाबरते आणि योगा करते. मला जेवढं कंगनाबाबत माहीत आहे तेवढं कुणाला माहीत नसेल. मी तर हेही सांगू शकतो की, कोण कंगनाच्या लायक आहे.
 

Web Title: Arjun Rampal looking for boys for Kangana Ranaut creates matrimonial bio