OMG ! भाईजानच्या वहिनीनंतर आता त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडकडे या अभिनेत्याने मागितला मोबाईल नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 12:28 IST2020-02-28T12:22:35+5:302020-02-28T12:28:54+5:30

वाचा नक्की काय आहे हे प्रकरण.

Arjun kapoors hilarious response to katrina kaif comment on his instagram photo gda | OMG ! भाईजानच्या वहिनीनंतर आता त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडकडे या अभिनेत्याने मागितला मोबाईल नंबर

OMG ! भाईजानच्या वहिनीनंतर आता त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडकडे या अभिनेत्याने मागितला मोबाईल नंबर

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं नातं आता कुणापासून लपून राहिलेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांचे फोटो सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अर्जुन कपूरने एक असा फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या फोटोचं कनेक्शन कतरिना कैफशी आहे.     


अर्जुन कपूर इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अर्जुन हँडसम हंक दिसतोय. अर्जुन फोटोमध्ये केसामधून हात फिरवताना दिसतोय. कॅटने अर्जुनने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. कतरिनाने अर्जुनच्या या फोटोवर कमेंट केली आहे की, 'काय झाले.... तुझं काही हरवलं आहे का ?' अर्जुनने ही कतरिना मोठ्या खुबीने उत्तर दिले आहे.   


कॅटच्या प्रश्नावर उत्तर देताना अर्जुन कपूर लिहितो, ''हा, तुझा मोबाईल नंबर हरवला आहे.'' यावर तिने अजूनपर्यंत काहीच उत्तर दिलेले नाही. 
वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, अर्जुन रकुलप्रीत सोबत लवकरच सिनेमात दिसणार आहे. त्या सिनेमाचे नाव अजून ठरलेले नाही. हा एक कॉमेडी ड्रामा सिनेमा असणार आहे. लवकरच या सिनेमाचे शूटिंगला पंजाब आणि लॉस एंजेलिसमध्ये शूटिंग होणार असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Arjun kapoors hilarious response to katrina kaif comment on his instagram photo gda