रोहित शेट्टीच्या 'सिंघम'मध्ये 'शैतान' बनून अर्जुन कपूर दाखवणार क्रूरता, पात्रावरून उठला पडदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 15:02 IST2024-03-10T14:54:29+5:302024-03-10T15:02:49+5:30

'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूर नायक नसून खलनायकाच्या भूमिकेत आहे.

Arjun Kapoor’s Character In Ajay Devgn Starrer Singham Again Is Named Danger Lanka | रोहित शेट्टीच्या 'सिंघम'मध्ये 'शैतान' बनून अर्जुन कपूर दाखवणार क्रूरता, पात्रावरून उठला पडदा!

रोहित शेट्टीच्या 'सिंघम'मध्ये 'शैतान' बनून अर्जुन कपूर दाखवणार क्रूरता, पात्रावरून उठला पडदा!

बॉलिवूडचे काही असे चित्रपट आहेत, ज्यांचे पुढे कितीही भाग बनले तरी ते सुपरहिटच होताच. यांमध्ये सिंघम या सिनेमाचा मोठा वाटा आहे. सिंघमचे पहिले दोन भाग यशस्वी झाल्यानंतर आता त्याचा तिसरा भाग लवकरच येणार आहे. रोहित शेट्टीचा आगामी 'सिंघम अगेन' हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. रिलीजसाठी भरपूर अवकाश असूनही या सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 

चित्रपटातील सर्व कलाकारांची पात्रे आणि फर्स्ट लूकचे पोस्टर्स एकापाठोपाठ एक रिलीज होत आहेत. 'सिंघम अगेन'मधील अजय देवगण, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि करीना कपूरनंतर आता सिनेमाचा खरा खलनायक अर्जुन कपूरच्या पात्राचं नाव उघड करण्यात आलं आहे. आता या चित्रपटात अभिनेता कोणती भूमिका साकारणार आहे हे कळले आहे. रोहित शेट्टीनेअर्जुन कपूरला असं एक पात्र दिलं आहे जे प्रेक्षकांच्या हृदयावर अमिट छाप सोडेल.

गेल्या महिन्यात रोहित शेट्टीने सिंघम अगेन (सिंघम ३) मधील अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक शेअर केला होता. पोस्टरमधील अभिनेत्याचा लूक थरारक असा होता.  हातात रक्ताने माखलेली तलवार, चेहऱ्यावर रक्त आणि अभिनेत्याचे उत्कट हास्य पाहून चाहते थक्क झाले होते. आता नवं सिनेमातील अर्जुन कपूरच्या पात्रावरून पडदा हटवला आहे.  बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, अर्जुन कपूर रोहित शेट्टीच्या ॲक्शन थ्रिलर सिंघम अगेनमध्ये डेंजर लंकाची भूमिका साकारणार आहे. अभिनेता जॅकी श्रॉफसोबत तो एक भयानक खलनायक असेल. ते दोघे मिळून सिंघमचा पराभव करतील.

अर्जुन कपूरच्या पात्राला डेंजर लंका असे नाव देण्यामागे एक मोठी कथा असल्याचं म्हटलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना कळेलच.  अर्जून कपूरचा हा अवतार पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले असून त्याचे कौतुक करत आहेत. हा २०२४ चा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल अशी अंदाजबांधणी काहींना आतापासूनच सुरु केली आहे. 'सिंघम अगेन' हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा चित्रपट आहे, ज्यामध्ये यावेळी 'सिम्बा' म्हणजेच रणवीर सिंह आणि 'सूर्यवंशी' म्हणजेच अक्षय कुमारही सिंघमसोबत शत्रूंचा खात्मा करताना दिसणार आहे. या टीमला आणखी मजबूत करण्यासाठी एसीपी सत्या हे पात्र टायगर श्रॉफ साकारणार आहे.
 

Web Title: Arjun Kapoor’s Character In Ajay Devgn Starrer Singham Again Is Named Danger Lanka