पार्श्वगायनातून निवृत्तीनंतर अरिजीत सिंहने घेतला मोठा निर्णय, आता करणार 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:39 IST2026-01-28T10:38:52+5:302026-01-28T10:39:29+5:30
अरिजीत सिंहच्या सिनेमात कोण असणार मुख्य भूमिकेत? नावं समोर

पार्श्वगायनातून निवृत्तीनंतर अरिजीत सिंहने घेतला मोठा निर्णय, आता करणार 'हे' काम
गायक अरिजीत सिंहने काल सर्व चाहत्यांना धक्काच दिला. पार्श्वगायनातून निवृत्त होत असल्याची त्याने घोषणा केली. अरिजीतच्या या निर्णयामुळे चाहते निराश झाले आहेत. ब्रेकअपनंतर अरिजीतच्या गाण्यांची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ होती. पण आता अरिजीत सिंह स्वतंत्र म्युझिक बनवणार आहे. त्यातच तो फिल्ममेकर म्हणूनही पुढे येणार असल्याची चर्चा आहे. करिअरमध्ये तो एका नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे.
'पिंकव्हिला' रिपोर्टनुसार, अरिजीत सिंह फिल्ममेकिंगवर फोकस करणार आहे. दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून तो काम करणार आहे. आगामी सिनेमातून तो आपल्याच लेकाला सिनेइंडस्ट्रीत आणणार आहे. त्याच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दीकीची मुलगी शोरा मुख्य भूमिकेत असणार आहे. जंगल अॅडव्हेंचरवर आधारित हा पॅन इंडिया सिनेमा असणार आहे. सिनेमासाठी अरिजीत खूप उत्साहित आहे. अनेक दिवसांपासून त्याला सिनेमा दिग्दर्शित करण्याची इच्छा होती. यासाठी तो शांतपणे त्याचा वेळ घेत स्क्रिप्टवर काम करत होता. अरिजीतची पत्नी कोएल सिंहसोबत मिळून त्याने सिनेमाच्या लिखाणाचंही काम केलं आहे. अरिजीत, त्याची पत्नी कोयल आणि महावीर जैन मिळून सिनेमाची निर्मिती करणार आहेत.
पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन येथे सिनेमाचं शूट सुरु आहे. सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि दिव्येंदु भट्टाचार्य यांचाही स्पेशल अॅपिअरन्स असणार आहे. हा पॅन इंडिया सिनेमा फिल्म फेस्टिलवल्समध्येही रिलीज केला जाणार आहे. फिल्ममेकर म्हणून अरिजीतचा हा पहिलाच सिनेमा नसून याआधी २०१८ साली त्याने Sa बंगाली सिनेमा बनवला होता. यामध्ये एका मुलाचा संगीत प्रवास दाखवण्यात आला होता.