दीपिका पादुकोणकडे आहे गुड न्यूज? या फोटोमुळे रंगलीय सगळीकडे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 12:11 IST2020-05-06T12:10:41+5:302020-05-06T12:11:39+5:30

दीपिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे ही चर्चा रंगली आहे.

'Are You Pregnant?', Fans Ask After Deepika Padukone Shares A Picture Of Raw Mangoes PSC | दीपिका पादुकोणकडे आहे गुड न्यूज? या फोटोमुळे रंगलीय सगळीकडे चर्चा

दीपिका पादुकोणकडे आहे गुड न्यूज? या फोटोमुळे रंगलीय सगळीकडे चर्चा

ठळक मुद्देदीपिकाने इन्स्टाग्रामवर तिखट, मीठ लावलेल्या कैरीच्या फोडींचा फोटो पोस्ट केला आहे. दीपिकाने कैरीचा फोटो पोसेट करताच तिच्याकडे गुड न्यूज आहे का अशा चर्चांना उधाण आले आहे.

दीपवीर अर्थात दीपिका पादुकोणरणवीर सिंग हे चाहत्यांचे बॉलिवूडचे लाडके कपल सध्या लॉकडाऊनमुळे घरात कैद झालेय. पण हो, सोशल मीडियावर मात्र हे कपल चांगलेच अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या दीपिका व रणवीर दोघेही लॉकडाऊनमुळे घरी आहेत आणि सोशल मीडियावर काही ना काही फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतात. पण दीपिकाने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे आता एक वेगळीच चर्चा रंगली आहे.

दीपिकाने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तुझ्याकडे गुड न्यूज आहे का असे तिचे फॅन्स तिला विचारत आहेत. दीपिकाने इन्स्टाग्रामवर तिखट, मीठ लावलेल्या कैरीच्या फोडींचा फोटो पोस्ट केला आहे. दीपिकाने कैरीचा फोटो पोसेट करताच तिच्याकडे गुड न्यूज आहे का अशा चर्चांना उधाण आले आहे. दीपिकाने या फोटोसोबत लिहिले आहे की, तू सगळ्यात बेस्ट आहेस... आतापर्यंत मी ज्यांना भेटली आहे, त्यामध्ये सगळ्यात सुंदर...

दीपिका गरोदर आहे आहे असा प्रश्न दीपिका आणि रणबीरचे फॅन्स कमेंटच्या माध्यमातून विचारत आहेत. पण या प्रश्नावर त्या दोघांनीही मौन राखणेच पसंत केले आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी इटलीत नोव्हेंबर 2018 ला लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला केवळ जवळचे मित्रमैत्रीण आणि नातलग उपस्थित होते. बॉलिवूडचे सर्वात सुंदर जोडपे अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्नबंधनात अडकले. त्यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. त्यांनी कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. 

Web Title: 'Are You Pregnant?', Fans Ask After Deepika Padukone Shares A Picture Of Raw Mangoes PSC